Shraddha Kapoor Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shraddha Kapoor: प्रियांका चोप्राला मागे टाकत श्रद्धा कपूरने रचला नवा इतिहास; सर्वाधिक फॉलोअर्सच्या यादीत दुसऱ्या स्थानांवर

Shraddha Kapoor Insta Followers: सध्या श्रद्धाचा हॉरर कॉमेडी स्त्री 2 चित्रपट बॉक्स ऑफिस गाजवताना दिसतोय. या चित्रपटासह श्रद्धाने अनेक रेकॉर्ड केले आहेत.

Manasvi Choudhary

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर इंडस्ट्रीत उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते. श्रद्धाने अनेक आव्हानात्मक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. सध्या श्रद्धाचा हॉरर कॉमेडी स्त्री 2 चित्रपट बॉक्स ऑफिस गाजवताना दिसतोय. या चित्रपटासह श्रद्धाने अनेक रेकॉर्ड केले आहेत.

श्रद्धा कपूर सर्वाधिक फॉलोवर्स असलेली भारतीय अभिनेत्री ठरली आहे. स्त्री 2 या चित्रपटामुळे श्रद्धा कपूरच्या चाहत्यांमध्ये वाढ झाली आहे. दिवसेंदिवस श्रद्धाची फॅनफॉलोविंग वाढत आहे. सध्या इंन्स्टाग्रामवर श्रद्धाचे 92 मिलियन फॉलोअर्स आहेत.

अलिकडेच श्रद्धाने फॅनफॉलोविंगमध्ये नरेंद्र मोदींना मागे टाकलं होतं. आता श्रद्धाने अभिनेत्री प्रियांका चोप्राला देखील मागे टाकलं आहे. श्रद्धा आता सर्वाधिक फॉलोअर्सच्या यादीत तिसऱ्या स्थानकांवर आहे तर पहिल्या स्थानावर क्रिकेटर विराट कोहली आहे. विराट कोहलीची फॅनफॉलोविंग 270 मिलियन आहे.

सध्या श्रद्धाचे इंन्स्टाग्रामवर एकूण 91 मिलियन फॉलोअर्स आहेत. श्रध्दा कपूरने भारताचे पंतप्रधान यांना मागे टाकत हा नवा विक्रम रचला आहे. श्रद्धा कपूरच्याआधी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वाधिक फॉलोअर्सच्या यादीत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फॉलोअर्स 91.3 मिलियन होते.सध्याच्या घडीला श्रद्धा कपूरचे 91.5 मिलियन झाले आहे.

अभिनेत्रीने श्रद्धा कपूरने वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षा चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. तीन पत्ती या चित्रपटातून श्रद्धाने सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. यानंतर श्रद्धाने आशिकी 2 या चित्रपटामध्ये काम केले . आशिकी 2 हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटामुळे श्रद्धाला खरी ओळख मिळाली. यानंतर श्रद्धा एक व्हिलन, हैदर, एबीसीडी 2, बागी, छिछोरे या चित्रपटात दिसली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक गाडी, तीन मजली घर अन् पार्किंग चक्क गच्चीवर! बिहारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Drought Crisis: अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट; 19 जिल्ह्यातील 83 तालुक्यांना फटका

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

SCROLL FOR NEXT