Sonakshi Sinha And Reena Roy Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sonakshi Sinha-Reena Roy: सोनाक्षी सिन्हा अभिनेत्री रिना रॉय सारखी का दिसते? अभिनेत्रीने केला मोठा खुलासा

रीना रॉय यांनीच त्यांचा आणि सोनाक्षीचा चेहरा हुबेहूब असल्याचे खुलासा केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Reena Roy and Sonakshi Sinha Relationship: बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्रींमध्ये रीना रॉय यांचे नाव आवर्जून घेतले जाते. ७०च्या दशकात अभिनेत्री रीना रॉय यांनी त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य केले. बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि रीना रॉय यांच्या सौंदर्याची तुलना गेल्या अनेक महिन्यांपासून होत आहे. आता यावर रीना रॉय यांनी मोठा खुलासा केला आहे.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या 'दबंग' चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. सोनाक्षी सिन्हा प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी आहे. तिचा चित्रपट बघताच अनेकांना अभिनेत्री रीना रॉय यांची आठवण झाली.

लोकांचे म्हणणे होते की रीना रॉय आणि सोनाक्षी सिन्हा एकसारख्या दिसतात. हे काही अंशी खरं देखील आहे. जर तुम्ही पहिल्यांदा या दोघींचे फोटो पहिले तर तुम्ही चक्रावून जाल. आता रीना रॉय यांनीच त्यांचा आणि सोनाक्षीचा चेहरा हुबेहूब असल्याचे खुलासा केला आहे.

माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीमध्ये रीना रॉय यांनी यावर त्यांचे मत व्यक्त केले आहे. त्या म्हणाल्या, 'हा एक निव्वळ योगायोग आहे. माझी आई आणि बॉलिवूड अभिनेते जितेंद्र यांची आई सुद्धा हुबेहूब दिसायच्या. या जगात असे कधी-कधी होऊचा शकते.' अशाप्रकारे रीना रॉय यांनी सर्व अफवांवर ब्रेक लावला आहे. तसेच हे सुद्धा स्पस्ट केले आहे की यांचे आणि सोनाक्षी सिन्हाशी कोणतेही नाते नाही.

सोनाक्षी सिन्हाचे वडील अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आणि अभिनेत्री रीना रॉय यांच्या अफेअर त्यावेळी खूप चर्चेत होती. असे म्हटले जाते की हे दोघेही बरीच वर्ष रिलेशनशिपमध्ये होते, परंतु नशिबात कदाचित काहीतरी वेगळे होते, ज्यामुळे या दोन सुपरस्टार्सचे लग्न होऊ शकले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Noida Building Fire: ५ मजली इमारतीला भीषण आग, २ जणांचा मृत्यू; स्कूटी चार्ज करताना झालेल्या ब्लास्टमुळे घडली दुर्घटना

मोठी बातमी! माजी खासदार विनायक राऊतांच्या अडचणी वाढल्या, कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता, मोठी अपडेट समोर

Maharashtra News Live Update: संत सोपान काकांच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा आज पार पडला

इथेनॉल मिश्रित पेट्रोलवरून तुफान चर्चा; नितीन गडकरींची बदनामी केल्याप्रकरणी ४ प्रसिद्ध एन्फ्ल्यूएन्सर कोण? कोणावर गुन्हा दाखल

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर ₹१५०० जमा, जूनच्या हप्त्याचे पैसे तुम्हाला आले का? लगेच अकाऊंट तपासा

SCROLL FOR NEXT