Aadil Khan And Somi Khan Wedding Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rakhi Sawant ला सोडल्यानंतर Aadil Khan ने केलं गुपचूप लग्न, 'बिग बॉस 12' फेम अभिनेत्रीसोबत बांधली लग्नगाठ

Aadil Khan Durrani Married With Somi Khan: आदिल आणि सोमीच्या निकाहचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आदिलच्या दुसऱ्या लग्नाची बातमी ऐकून राखी सावंतला मोठा धक्का बसला आहे. तर आदिलने सोमीसोबतचे हे माझं पहिलं लग्न असल्याचे म्हटले आहे.

Priya More

Aadil Khan And Somi Khan Wedding:

बॉलिवूडची (Bollywood) 'ड्रामा क्वीन' राखी सावंतच्या (Rakhi Sawant) पूर्वाश्रमीचा पती आदिल खान दुर्रानी (Aadil Khan Durrani) पुन्हा एकदा आपल्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत आला आहे. आदिलने दुसऱ्यांदा लग्न केले आहे. आदिलने 'बिग बॉस 12'ची स्पर्धक सोमी खानसोबत गुपचूप निकाह केला आहे. आदिल आणि सोमीच्या निकाहचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आदिलच्या दुसऱ्या लग्नाची बातमी ऐकून राखी सावंतला मोठा धक्का बसला आहे. तर आदिलने सोमीसोबतचे हे माझं पहिलं लग्न असल्याचे म्हटले आहे.

आदिल खान दुर्रानीने 'बिग बॉस 12' फेम सोमी खानसोबतच्या लग्नाबद्दल खुलासा केला. आदिलने सोमीसोबत लग्न केल्यानंतर मोकळेपणाने एका मुलाखतीत दावा केला आहे की, 'हे माझ पहिले लग्न आहे आणि येत्या काही दिवसांत मी सर्वांशी शेअर करणार आहे. आम्ही सध्या बंगळुरूमध्ये आहोत. उद्या मुंबईला जाऊ. लग्नाबाबत आम्ही दोघेही अधिकृत घोषणा करणार आहोत. मी लवकरच सर्व काही शेअर करेन.' आदिल आणि सोमीने 2 मार्च 2024 रोजी जयपूरमध्ये लग्न केल्याचे सांगितले जात आहे.

सोमी खान तिची बहीण सबा खानसोबत 'बिग बॉस 12' मध्ये सहभागी झाली होती. या सीझनमध्ये अभिनेत्री दीपिका कक्कर विनर ठरली होती. आदिल खान दुर्रानीचे पहिले लग्न राखी सावंतसोबत झाले होते. पण राखीने आदिलवर अनेक आरोप केल्यानंतर गेल्या वर्षी दोघे वेगळे झाले. त्यानंतर 7 फेब्रुवारी 2023 रोजी आदिलला अटक करण्यात आली होती. आदिलच्या आधी राखीचे लग्न रितेशसोबत झाले होते. या दोघांनी 'बिग बॉस 15'च्या घरात एकत्र एन्ट्री केली होती.पण या शोच्या ग्रँड फिनालेनंतर लगेचच ते वेगळे झाले होते. फेब्रुवारी 2022 मध्ये राखीने रितेशपासून वेगळे झाल्याची घोषणा केली होती.

दरम्यान, आदिल खान दुर्रानीची पत्नी सोमी खान ही एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. सोमीने अनेक शोमध्ये काम केले आहे. 'न्याय: द जस्टिस', 'केसरिया बालम' आणि 'हमारा हिंदुस्तान' यासारख्या शोमध्ये ती सहभागी झाली होती. बिग बॉसमुळे सोमीला चांगली प्रसिद्धी मिळाली होती. आता ती आदिलसोबत लग्न केल्यामुळे चर्चेत आली आहे. सध्या सोमी आणि आदिलवर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. तर अनेकांनी त्याला ट्रोल देखील केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

Thackeray Brothers : ठाकरेंच्या लढ्याला दक्षिणेचा पाठिंबा, थेट मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, म्हणाले प्रेरणादायी...

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

SCROLL FOR NEXT