Priyanka Chopra SAAM TV
मनोरंजन बातम्या

Priyanka Chopra : ९०च्या दशकातल्या सुपरस्टारला किस करण्यास प्रियांका चोप्राने दिला होता नकार, नेमकं प्रकरण काय होतं?

Annu kapoor : प्रियांका चोप्रा आणि अन्नू कपूर यांमध्ये एका चित्रपटाच्या सीनवरून वाद झाला. आता यावर अन्नू कपूर यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

Shreya Maskar

बॉलिवूडचे अभिनेते अन्नू कपूर यांनी अनेक चित्रपटात काम केले आहे. आपल्या अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. नुकत्याच झालेल्या एका मीडिया मुलाखतीत अन्नू कपूर यांनी प्रियांका चोप्रासोबत (Priyanka Chopra) झालेल्या वादावर भाष्य केले आहे. प्रियांका चोप्राने अन्नू कपूर (Annu Kapoor ) या किस करण्यास नकार दिला होता. यावर अन्नू कपूर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

'सात खून माफ' या चित्रपटात प्रियांका चोप्रा आणि अन्नू कपूर हे एकत्र काम करत होते. या चित्रपटात त्यांचा एक किसींग सीन होता. जो करण्यास प्रियांका चोप्राने नकार दिला होता. त्यावर मुलाखतीत प्रश्न विचारल्यावर अन्नू कपूर म्हणाले की, "मी जर हिरो असतो तर प्रियंका चोप्राला मला किस करायला कोणताही प्रोब्लेम नव्हता. आपल्या इंडस्ट्रीत हिरोला किस करायला कोणत्याही हिरोईनला कधीच अडचण नसते. पण माझ्या सारख्या रूप आणि व्यक्तिमत्व नसलेल्या व्यक्तीला किस देण्यास बहुधा तिचा नकार असावा."

'सात खून माफ' हा चित्रपट 2011 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात प्रियांकाच्या सात पतींची कहाणी दाखविण्यात आली आहे.

सुपरस्टार प्रियांका चोप्राने अनेक हिट चित्रपट केले आहेत. सध्या तिचे चाहते तिच्या आगामी चित्रपटाची वाट पाहत आहे. प्रियांका आपल्या लूकमुळे कायम चर्चत असते. तिच्या प्रत्येक प्रोजेक्टवर चाहते भरभरून प्रेम करतात. प्रियांका चोप्राचा इंडस्ट्रीतील प्रवास हा खूप खडतर होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gondia News : आमदार चंद्रिकापुरे यांचा तिसऱ्या आघाडीत प्रवेश; मोरगाव अर्जुनीत तिरंगी लढत होण्याची शक्यता

Maharashtra News Live Updates: शेकापचे जयंत पाटील घेणार शरद पवारांची भेट

Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरला मिळणार राज्याचा दर्जा? केंद्र सरकार मोठ्या तयारीत; वाचा सविस्तर माहिती

IND vs NZ, 2nd Test, Day 1: पहिल्या दिवसाचा खेळ संपला, १६ धावांवर टीम इंडियाने गमावली १ विकेट

Maharashtra Election : मोठी बातमी! राज्यात मतदानाच्या दिवशी सुट्टी, नेमकी कुणाला मिळणार?

SCROLL FOR NEXT