Priyanka, Nick Dinner Photos Instagram/ @jerryxmimi
मनोरंजन बातम्या

Priyanka Chopra: सासूबाईंची काळजी घेताना जावयाची जोरदार चर्चा, जावई असावा तर निक जोनससारखा

प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी एकत्र दिवाळी साजरी केली आहे. विशेष प्रसंग अधिक संस्मरणीय बनवण्यासाठी त्यांनी एका शानदार डिनरचा आनंद घेतला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Priyanka Chopra: प्रियांका चोप्रा ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील संवेदनशील अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. प्रियंकाने निक जोनसशी (Priyanka Chopra) लग्न केले असून या दोघांचीही सर्वच ठिकाणी खूप चर्चा रंगत असते. अनेकदा त्यांच्या रोमँटिक आउटिंगने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. निकसध्या आपल्या सासूबाईंची चांगलीच काळजी घेताना दिसत आहे. प्रियांका आणि निक दिवाळीत डिनर एन्जॉय करत आहे. त्यांच्यासोबत प्रियांकाची आई मधु चोप्रा देखील सामील झाली होती. (Nick Jonas)

प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी एकत्र दिवाळी साजरी केली आहे. विशेष प्रसंग अधिक संस्मरणीय बनवण्यासाठी त्यांनी एका शानदार डिनरचा आनंद घेतला आहे. दोघांमध्ये प्रियांकाची आई मधूही सामील झाली होती. एका फॅन पेजने आउटिंगचे फोटो शेअर केले असून त्यामध्ये निक आपल्या सासूचा हात प्रेमाने धरताना आणि तिच्यासोबत दिसत आहे. (Bollywood Actress)

सोशल मीडियावर चाहते या फोटोंचे कौतुक करत आहेत. एका युजरने लिहिलं, ‘खूप सुंदर फोटो.’ दुसऱ्या एका यूजरने लिहिलं, ‘आम्ही त्या प्रत्येक व्यक्तीवर प्रेम करतो जो आपल्या सासूवर प्रेम करतो.’ याशिवाय अनेक युजर्स या फोटोंवर कमेंट्स करत निक जोनसवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. (Marathi Entertainment News)

जेवढी प्रियांका सोशल मीडियावर चर्चेत असते, तेवढीच ती ट्रोलही होते. तिने गेल्या काही दिवसांपूर्वी फटाक्यांबद्दल केलेल्या वक्तव्यांमुळे ती चर्चेत होती. प्रियांका चोप्राच्या कामाबद्दल बोलायचे झालं तर ती आजकाल बॉलिवूडपेक्षा हॉलिवूड प्रोजेक्ट्समध्ये जास्त दिसत आहे. ती शेवटची ‘मॅट्रिक्स रिअॅक्शन’मध्ये दिसली होती. दुसरीकडे, तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचं तर ती लवकरच ‘इट्स ऑल कमिंग बॅक टू मी’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे.

Edit By: Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT