Priyanka Chopra Life Unknown Facts Instagram @priyankachopra
मनोरंजन बातम्या

Priyanka Chopra Life Unknown Facts: क्रिमिनल सायकॅस्ट्रीस्ट व्हायचं होतं, पण झाली अभिनेत्री; प्रियांकाने ‘या’ तमिळ चित्रपटातून केलं होतं पदार्पण

Chetan Bodke

Priyanka Chopra Life Unknown Facts: बॉलिवूडसह हॉलिवूडमध्ये देखील आपल्या आभिनयाकरिता चर्चेत राहिलेल्या प्रियंका चोप्राचा आज वाढदिवस. आपल्या २३ वर्षांच्या सिनेकारकिर्दित अभिनेत्रीने अनेक चढ उतार पाहिलेत. प्रियंकाचा जन्म जमशेदपूरमध्ये १८ जुलै १९८२ रोजी झाला होता. प्रियांका चोप्राची आई मधु चोप्रा आणि वडील अशोक चोप्रा भारतीय सैन्यात डॉक्टर होते. त्यामुळे त्यांची जशी पोस्टिंग होईल तसं त्यांना जायला लागायचं. प्रत्येक पोस्टिंगला प्रियांकाची शाळा बदलायची. प्रियंका चोप्राचं लहानपणापासूनच अभिनेत्री नाही तर क्रिमिनल सायकेट्रीस्ट बनण्याचे स्वप्न होते.

बारावीमध्ये असताना प्रियंकाने मिस वर्ल्ड स्पर्धा जिंकल्यानंतर कॉलेज अर्धवट सोडलं. अभिनेत्रीचं जरी बारावी पर्यंत शिक्षण झालं असलं तरी, तिच्या २३ वर्षांच्या कारकिर्दीतील मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपले नाव कोरले आहे. प्रियंका चोप्राने आतापर्यंत ८० हून अधिक चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये तिने काम केले आहे. मिस वर्ल्ड झाल्यानंतर प्रियांकाला बॉलिवूडमधून अनेक ऑफर्स यायला सुरूवात झाली. प्रियंका चोप्राने तिच्या करियरची सुरुवात ‘साजन मेरे सतरंगिया’ या शॉर्टफिल्म पासून केली.

प्रियांका चोप्राने ‘थमिझा’ नावाचा पहिला तमिळ चित्रपट केला होता. त्यानंतर, २००३ मध्ये प्रियांकाने ‘द हिरो: लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय’मध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती. पण त्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘अंदाज’ या चित्रपटाने प्रियांकाच्या आयुष्याला कलाटणी दिली. त्या चित्रपटामुळे प्रियंका एक सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणून सर्वत्र फेमस झाली.

‘अंदाज’नंतर प्रियांकाने प्लॅन, किस्मत, इम्पॉसिबल या आणि अनेक चित्रपटातील तिच्या भूमिका प्रसिद्ध झाल्या. २००५ मध्ये डेविड धवन स्टारर ‘मुझसे शादी करोगी’ या चित्रपटात प्रियांका चोप्राच्या अभिनयाने सर्वांनाच तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली. प्रियांका चोप्राने आपल्या सिनेकारकिर्दित जवळपास दीड दशक अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

बॉलिवूडनंतर २०१६ मध्ये प्रियांका चोप्रा हॉलिवूडकडे वळली. प्रियांका चोप्राने हॉलिवूडमध्ये प्रमुख भूमिका साकारणारी ती पहिलीच बॉलिवूड अभिनेत्री होती. २०१८ मध्ये प्रियंका चोप्राने निक जोनाससोबत लग्न केले. सध्या प्रियांका- निक आणि मालती अमेरिकेत राहत आहेत. नुकतीच अभिनेत्री सिटाडेल या वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांचा वेगवान आढावा

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

SCROLL FOR NEXT