Poonam Pandey Saam Tv
मनोरंजन बातम्या

Poonam Pandey Net Worth: पूनम पांडेची संपत्ती किती होती?, वांद्र्यामध्ये आलिशान अपार्टमेंट आणि महागडी कार

Poonam Pande Passed Away: पूनम पांडे ही एक भारतीय मॉडेल आणि अभिनेत्री आहे. पूनम पांडेने 2013 मध्ये 'नशा' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. पूनम पांडेने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती.

Priya More

Poonam Pandey Death:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेचे (Poonam Pandey) निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पूनम पांडेचे गर्भाशयाच्या कॅन्सरमुळे निधन झाले आहे. सोशल मीडियावर पूनम पांडेच्या निधनाची पोस्ट व्हायरल होत आहे. पूनमच्या निधनाचे वृत्त कळाताच तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. पूनमचे निधन झाल्याच्या वृत्तावर तिच्या चाहत्यांना विश्वास बसत नाहीये. ते ही फेक न्यूज असल्याचे आणि तिचे अकाऊंट हँक झाल्याचे म्हणत आहेत. अशामध्ये आज आपण पूनम पांडेच्या करिअरविषयी आणि तिच्या नेटवर्थबद्दल (Poonam Pandey Net Worth) जाणून घेणार आहोत...

पूनम पांडे ही एक भारतीय मॉडेल आणि अभिनेत्री आहे. पूनम पांडेने 2013 मध्ये 'नशा' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. पूनम पांडेने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती. पूनम पांडे सोशल मीडियावर खूप सक्रिय असायची. तिचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. तिचे इन्स्टाग्रामवर 1.2 मिलियन फ़लोअर्स आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहत होती.

2011 मध्ये पूनम पांडेने मोठे वक्तव्य केले होते. खऱ्या अर्थाने तेव्हाच ती सर्वात जास्त चर्चेत आली. 2011 मध्ये तिने टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मी कपडे काढेल असे वक्तव्य केले होते. त्यामुळे पूनम पांडेची जोरदार चर्चा झाली होती. या प्रकरणावरून मोठा वाद निर्माण झाला होता. पूनम पांडेच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर, पूनम पांडेची एकूण संपत्ती सुमारे 52 कोटी रुपये इतकी आहे. पूनम पांडेचे मुंबईतल्या वांद्र्यामधील पॉश एरियामध्ये स्वतःचे अपार्टमेंट आहे. तिच्या या आलिशान अपार्टमेंटची किंमत करोडोंमध्ये आहे.

पूनम पांडेकडेही एक आलिशान कार आहे. तिच्याकडे लक्झरी आणि महागडी BMW 5 सीरीज सेदान कार देखील आहे. ज्याची किंमत 55 लाखांपेक्षा जास्त आहे. पूनम पांडे अभिनय आणि मॉडेलिंगसोबतच जाहिरातींमधूनही भरपूर कमाई करत होती. पूनम पांडे एका चित्रपटासाठी सुमारे 1 कोटी रुपये फी घेत होती. पूनम पांडे सोशल मीडियावर खूप सक्रिय होती. या माध्यमातून देखील ती भरपूर कमाई करत होती.

पूनम पांडे कंगना रनौतच्या 'लॉक अप' शोमध्ये सहभागी झाली होती. या शोमध्ये ती बोल्ड आणि सिजलिंग कैदी होती. तिने या शोमध्ये आपल्या सौंदर्याचा जलवा दाखवला होता. पूनम पांडेने या शोसाठी एका आठवड्यासाठी ३ लाख रुपये फी घेत होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral video mumbai: मुंबईतील मुलुंड स्टेशनवर घडला धक्कादायक प्रकार, रूळांवर उतरून दोन तरुणांची हाणामारी

Maharashtra Live News Update: वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर पुणे पोलिसांकडून पुन्हा मोठी कारवाई

खाकीने ओलांडली मर्यादा! पोलीस ठाण्यातच ASI कडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी; हादरवणारा व्हिडिओ समोर

Badishep Water Benefits: कडाक्याच्या उन्हाळ्यात रोज सकाळी बडीशेप पाणी पिण्याने मिळतील 'हे' आरोग्यदायी फायदे

School Holidays: पालकांसाठी महत्त्वाची बातमी! एप्रिल महिन्यात इतके दिवस शाळांना सुट्टी; वाचा यादी

SCROLL FOR NEXT