Parineeti Chopra Saam Tv
मनोरंजन बातम्या

Parineeti Chopra: हातात चुडा अन् ब्लॅक कलरचा स्विमसूट... मालदीवमध्ये एकटी काय करतेय परिणीती चोप्रा?

Parineeti Chopra At Maldives: परिणीती चोप्रा सध्या सुट्ट्या इन्जॉय करण्यासाठी मालदीवला गेली आहे. याठिकाणावरून परिणीतीने शेअर केलेला फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

Priya More

Parineeti Chopra Photo:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री परिणीती चोप्राने (Parineeti Chopra) 24 सप्टेंबरला आपचे खासदार राघव चड्ढासोबत लग्न केले. उदयपूरमध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडला. लग्न झाल्यापासूनच परिणीती चोप्रा चर्चेत आहे.

लग्नानंतरच्या नवनवीन लूकमुळे परिणीती चर्चेत असते. अशामध्ये परिणीती चोप्रा सध्या सुट्ट्या इन्जॉय करण्यासाठी मालदीवला गेली आहे. याठिकाणावरून परिणीतीने शेअर केलेला फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

परिणीती चोप्राने सोमवारी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहे. या फोटोंना दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. परिणीतीने बीचवर बसून एक फोटो काढला आहे ज्यामध्ये तिने ड्रिंगचा ग्लास हातामध्ये धरलेला दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये 'गर्ल्सट्रिप' असे लिहिले आहे. त्यानंतर परिणीतीने आणखी काही फोटो शेअर करत हा फोटो हनिमूनचा नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. हा फोटो माझ्या नणंदेने काढल्याचे तिने सांगितले.

परिणीती चोप्राने हातामध्ये गुलाबी रंगाचा चुडा आणि ब्लॅक कलरच्या स्विमसूटमध्ये हा फोटो काढला आहे. या फोटोमध्ये परिणीती समुद्राकडे पाहात पोझ देताना दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देत तिने असे लिहिले की, 'हनीमूनला गेली नाही. हा फोटो नणंदने काढलाय! यासह तिने #GirlsTrip @waldorfastoriamaldives @makeplansholidays #makeplansHolidays #liveunforgettable।' असे हॅशटॅग दिले आहेत. परिणीतीच्या या फोटोला चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत आहे. तिच्या या फोटोला ६ लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. परिणीती मालदीवला तिच्या सासरच्या मंडळींसोबत गेली आहे.

परिणीती चोप्राने नुकताच दिल्लीतील लॅक्मे फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक केला होता. यावेळी परिणिती चोप्राने साडी नेसली होती आणि त्यासोबत तिच्या हातातल्या बांगड्या आणि सिंदूरने सर्वांचे लक्ष वेधलं होतं. परिणीती चोप्राला असे रॅम्प वॉक करताना पाहून लोकांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. परिणीती चोप्राच्या रॅम्प वॉकचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tulsi Kadha Recipe : पावसात भिजल्यामुळे घसा खवखवतोय? पटकन प्या ग्लासभर तुळशीचा काढा

Maharashtra Rain Live News : उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली; महामार्ग वाहतुकीस बंद

Beed Crime News : "आम्ही सुरेश धसांची माणसं ... ", १२ हजारांच्या वादातून तरुणाचं अपहरण करून मारहाण

Rain Grant Scam : अतिवृष्टी अनुदान घोटाळा; अखेर २८ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल, २५ कोटींचा अपहार केल्याचा ठपका

Hero Glamour X125 विरुद्ध Honda Shine 125; फीचर्स, मायलेज, कोणती बाईक तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे?

SCROLL FOR NEXT