Parineeti- Raghav At Golden Temple Photos Instagram
मनोरंजन बातम्या

Parineeti- Raghav At Golden Temple: परिणीती- राघवचं लग्नाआधीचं देवदर्शन; पारंपरिक वेशातील लूकने लक्ष वेधलं

Parineeti- Raghav Reached Golden Temple: राघव- परिणीतीच्या घरी लग्नाची लगबग सुरू असतानाच त्यांनी आज सकाळी (०१ जुलै) अमृतसर मधील सुवर्णमंदिरात जाऊन दर्शन घेतले.

Chetan Bodke

Parineeti- Raghav At Golden Temple Photos: बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आपचे नेते राघव चड्ढा यांचा १३ मे रोजी साखरपुडा झाला. यांच्या साखरपुड्यानंतर आता गेल्या अनेक दिवसांपासून लग्नाची देखील चर्चा सुरू आहे. दोघांच्याही घरी लग्नाची लगबग सुरू असतानाच त्यांनी आज सकाळी (०१ जुलै) रोजी अमृतसर मधील सुवर्णमंदिरात दर्शनासाठी गेले आहेत. यांच्या लग्नाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू असताना त्यांनी अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात दर्शनासाठी गेल्यामुळे त्यांच्या लग्नाची चाहूल प्रेक्षकांना लागली आहे.

साखरपुड्यानंतर हे दोघेही अनेकदा उदयपूरहून दिल्ली विमानतळावर माध्यमकर्मींच्या कॅमेऱ्यांसमोर स्पॉट झाले होते. सध्या अनेक बॉलिवूड अभिनेत्यांचे उदयपूरमध्ये लग्न करण्याची एक वेगळीच हौस आहे. त्यांच्याप्रमाणे हे देखील उदयपूरमध्येच लग्नगाठ बांधण्याची शक्यता आहे. नुकतेच सोशल मीडियावर अमृतसरमध्ये दर्शन घेत असतानाचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे दोघेही सुवर्ण मंदिरात एकत्र दिसत आहेत.

यावेळी परिणीतीने ऑफ-व्हाइट सलवार कमीज आणि डोक्यावर ओढणी घेतली असून तिचा लूक खूपच सुंदर दिसतोय. तर आपचे खासदार राघव चढ्ढा यांनी पांढरा कुर्ता पायजमा, राखाडी नेहरू जॅकेट आणि डोक्यावर केशरी रूमाल बांधलेला दिसत आहे. मंदिरात दोघेही हातात हात घालून चालत असून एकमेकांवर असलेले निखळ प्रेम चाहत्यांना दिसून येत आहे. एकूणच दोघांच्या लग्नाची लगबग सुरु झालीय.

दरम्यान, परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा या वर्षी सप्टेंबर- नोव्हेंबर महिन्यामध्ये राजस्थानमध्ये लग्नबंधनात अडकणार असल्याची सध्या चर्चा आहे. अलीकडेच, अभिनेत्रीने उदयपूरमधील पर्यटन विभागाच्या उपसंचालकांची भेट घेतली आणि चांगली ठिकाणे आणि हॉटेल्सची चौकशी केली. यावेळी तिच्यासोबत तिचे कुटुंबीय देखील होते.

जर लग्न उदयपूरमध्ये झाले तर परिणीती तिची बहीण प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या पावलावर पाऊल ठेवेल. कारण प्रियंका आणि निकचं राजस्थानमध्ये लग्न मोठ्या थाटामाटात झाले होते. परिणीती- राघव कधी लग्न करणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor Missing : 'मुन्ना भाई एमबीबीएस'मधील लोकप्रिय अभिनेता बेपत्ता; गर्लफ्रेंडसोबत होती भांडणं, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Accident News : समृद्धी महामार्गावर एका रात्रीत चार अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! ५ वर्षात मिळणार ५ लाखांचं व्याज; वाचा सविस्तर

Lifestyle: हार्ट अटॅक आणि स्ट्रोक येण्यामागे आपल्या 'या' घाणेरड्या सवयी कारणीभूत; धोका कोणाला जास्त?

SCROLL FOR NEXT