Malaika Arora Father Dies : Saam tv
मनोरंजन बातम्या

Malaika Arora Father Dies : अभिनेत्री मलायकाच्या वडिलांचा आत्महत्येपूर्वी दोन्ही मुलींशी संवाद, फोनवर दोघांना नेमकं काय सांगितलं?

Malaika arora father dies : अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांनी वांद्रे पश्चिम येथील इमारतीच्या गच्चीवरून उडी आत्महत्या केली. अरोरा यांनी आत्महत्या करण्यापूर्वी दोन्ही मुलींशी संवाद साधला होता.

Vishal Gangurde

संजय गडदे, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : मलायका अरोराचे वडील अनिल यांचं बुधवारी सकाळी निधन झालं. त्यांनी इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून जीवन संपवलं. त्यांच्या आत्महत्येने सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे. अनिल यांनी आत्महत्या केलेल्या ठिकाणी कोणत्याही चिठ्ठी सापडली नाही. मात्र, अनिल यांनी आत्महत्येपूर्वी त्यांच्या दोन्ही मुलींशी संवाद साधला होता. त्यांनी दोन्ही मुलींशी संवाद साधल्यानंतर आयुष्य संवपलं.

अभिनेत्री मलायका अरोरा हिच्या सावत्र वडिलांनी आज बुधवारी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून जीवन संपवलं. अनिल मेहता असे आत्महत्या केलेल्या मलायकाच्या सावत्र वडिलांचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी अनिल मेहता यांनी मलायका अरोरा आमि अमृता अरोरा या दोन्ही मुलींशी फोनवरून संवाद साधला. दोन्ही मुलींना फोन करून मी आजारी असून थकलो आहे, असं बोलून त्यांनी जीवन संपवलं.

अनिल मेहता आणि त्यांची पत्नी वांद्रे पश्चिम येथील आयेशा मनोर या इमारतीत मागील अनेक वर्षांपासून राहत होते. अनिल मेहता यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार सकाळपासूनच मेहता कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेत आहेत. या प्रकरणानंतर पोलिसांनी एडीआर दाखल करून पार्थिव शवविच्छेदनासाठी महापालिकेच्या विलेपार्ले पश्चिमेकडे कुपर रुग्णालयात पाठवले आहे. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी मेहता कुटुंबातील सदस्य आणि प्रत्यक्षदर्शी यांच्याशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, घटनास्थळावरील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका व्हिडिओमध्ये अरबाज खान दिसत आहे. त्याच्यासोबत पोलीस देखील आहे. घटनेची माहिती मिळताच अनिल मेहता यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, रुग्णालयात त्यांना मृत घोषित केले. घटनेनंतर अरबाज खान, अलवीरा अग्निहोत्री, अर्जून कपूर दिसले. अनिल यांनी आत्महत्या केली, त्यावेळी मलायका पुण्याला होती. घटनेनंतर मलायका आणि अमृता दुपारी १ वाजता घटनास्थळी पोहोचल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

National Highway आणि Expressway मार्गांवर वाहनधारकांना मिळणार 'या' खास सुविधा; NHAI कडून प्रादेशिक कार्यालयांना निर्देश

SCROLL FOR NEXT