Madhuri Dixit Shared Photo With Apple CEO Tim Cook Twitter/ @MadhuriDixit
मनोरंजन बातम्या

Madhuri Dixit And Apple Ceo In Mumbai: ॲपल सीईओंना सुद्धा मुंबईच्या वडापावाची क्रेझ; माधुरी आणि कुक यांचा फोटोपाहून नेटकरी बुचकळ्यात

Madhuri Dixit Enjoy Vadapaav in Mumbai: ॲपलचे सीईओ सध्या मुंबईमध्ये ॲपलच्या शॉपचे उद्धाटन करण्यासाठी भारत दौऱ्यावर असून यावेळी माधुरी आणि ॲपलचे सीईओ टीम कूक यांनी एकत्र वडापावाचा अस्वाद घेतला.

Chetan Bodke

Madhuri Dixit Shared Photo With Apple CEO Tim Cook: मोबाईल क्षेत्रात नेहमी क्रांती घडवू पाहणाऱ्या ॲपल कंपनीचे सीईओ सध्या भारत दौऱ्यावर आहेत. ॲपलचे सीईओ सध्या मुंबईमध्ये ॲपलच्या शॉपचे उद्धाटन करण्यासाठी आले आहेत. यावेळी त्यांनी मुंबईतली स्पेशल डिश म्हणून सर्वत्र फेमस असणाऱ्या वडा पावाचा मनमुराद अस्वाद घेताना दिसले. वडापावाचा अस्वाद घेताना त्यांच्यासोबत बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित देखील होती. माधुरी आणि ॲपलचे सीईओ टीम कूक यांनी एकत्र वडापावाचा अस्वाद घेतला.

माधुरीने स्वत: ट्विटरवर हा फोटो शेअर केला असून कूक यांनीदेखील ‘धक धक गर्ल’ला ट्विटरवर रिप्लाय दिला. सध्या हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. माधुरी फोटो शेअर करताना कॅप्शन लिहिले की, ‘मुंबईत आल्यावर वडापावापेक्षा चांगले स्वागत कशाने केलं जाऊ शकेल.’ या फोटोमध्ये माधुरी आणि टीम कुकच्या हातात वडा पाव दिसत आहे. सोबतच, टेबलवर आणखी काही पदार्थ दिसत आहेत. माधुरीच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.

ॲपलचे सीईओ टीम कूक यांनी माधुरीने ट्वीटरवर शेअर केलेला फोटो रीट्वीट करत म्हटले की, ‘धन्यवाद माधुरी दीक्षित, पहिलावहिला वडापाव खाऊ घालण्यासाठी, खूपच टेस्टी होता.’ हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून चाहत्यांनी यावर बऱ्याच कमेंट केल्या आहेत.

मुंबईतील स्वाती स्नॅक्स कॉर्नरमध्ये माधुरी आणि टीमने या वडा पावाचा आस्वाद घेतल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टिम कुकने उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरी देखील भेट दिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : खासदार प्रणिती शिंदे आणि आमदार कल्याणशेट्टी यांच्यात वाकयुद्ध | Marathi News

Maharashtra News Live Updates: पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टर मधील बॅगांची करण्यात आली तपासणी

moravala Recipe: ‪आता घरच्या घरीच बनवा मोरावळा

Sambhajinagar News : उच्च न्यायालयाची निवडणूक आयोगास नोटीस; १५ लाख स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मतदानाचा प्रश्न

Maharashtra Election: विधानसभा निवडणुकीत हे लहान पक्ष सुद्धा ठरू शकतात 'गेम चेंजर'; कसे ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT