Famous Actress saam tv
मनोरंजन बातम्या

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्री सायबर क्राइमची शिकार, काही मिनिटांत अकाउंटमधून लाखो लंपास

Bollywood Actress Victim To Cyber Fraud : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्रीची सायबर फसवणूक झाली आहे. नेमकं घडलं काय, जाणून घ्या.

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेत्रीची सायबर फसवणूक

मुंबईत घडला हा धक्कादायक प्रकार

पोलीसात FIR दाखल

साम टिव्ही प्रतिनिधी - संजय गडदे

मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्रीची सायबर फसवणूक झाली आहे. वर्सोवा येथे राहणारी चित्रपट अभिनेत्री आणि निर्माती कीर्ति कुल्हारी हिची सायबर फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. अज्ञात सायबर गुन्हेगारांनी तिच्या मोबाईल फोन आणि क्रेडिट कार्डची अनधिकृत माहिती मिळवून अवघ्या काही मिनिटांत 2 लाख 43 हजार 852 रुपये काढून घेतले. या प्रकरणी कीर्ति कुल्हारीने पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे.

कीर्ति कुल्हारीने दिलेल्या तक्रारीवरून अंबोली पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कीर्ति कुल्हारी या वर्सोवा येथील यारी रोडवरील संगीता अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहतात. 24 जुलै 2026 रोजी रात्री सुमारे 9.31 वाजता त्या अंधेरी पश्चिम येथील फन रिपब्लिक मॉलजवळील सिनेपोलिस थिएटरमध्ये चित्रपट पाहत होत्या. त्याचवेळी त्यांच्या मोबाईलवर क्रेडिट कार्डवरून एअरोमेक्सिको एअरलाईन्ससाठी 2,525 अमेरिकन डॉलर्स खर्च झाल्याचा अलर्ट संदेश आला.

कीर्ति कुल्हारीला परदेशातील संशयास्पद व्यवहाराचा मेसेज मिळताच त्यांनी तातडीने बँकेच्या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधला. बँकेच्या अधिकाऱ्यांनी तपास केल्यानंतर त्यांच्या क्रेडिट कार्डवरून परवानगीशिवाय चार वेगवेगळे मोठे व्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित क्रेडिट कार्ड तात्काळ ब्लॉक करण्यात आले.या प्रकरणी अंबोली पोलिसांनी अज्ञात सायबर गुन्हेगाराविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT