Katrina Kaif and Salman Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Katrina-Salman: सलमानच्या बर्थडेला कतरिनाची दांडी, तरीही चर्चेत, काय आहे कारण?

कतरिना कैफ सलमान खानच्या वाढदिवसाला दिसली नाही.

Pooja Dange

Salman Khan Birthday: सलमान खान आज (२७ डिसेंबर) ५७ वर्षाचा झाला आहे. सलमानने काल रात्री त्याच्या बर्थडेची ग्रँड पार्टी दिली होती. त्याच्या बर्थडे पार्टीला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. परंतु यावर्षी कतरिना कैफ त्याच्या वाढदिवसाला दिसली नाही. कतरिना आणि विकी कौशल व्हेकेशनवर गेले आहेत. मात्र कतरिनाने न विसरता सलमानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

कतरिना आणि सलमान दोघांचं बॉन्डिंग खूपच भारी आहे. कतरिनाने सलमानला सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या आहेत. कतरिनाने सलमानचा फोटो स्टोरीला शेअर करत लिहिले आहे की, 'टायगर, टायगर, टायगरचा बर्थडे' असं म्हणून कतरिनाने सलमानला टॅग सुद्धा केले आहे. (Katrina Kaif)

कतरिनाने सलमानचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो वापरला आहे. त्याचा हा फोटो त्यांच्या टायगर या चित्रपटातील आहे. कतरीना आणि सलमान टायगर चित्रपटाच्या फ्रेंचायजीचा भाग आहेत आणि त्यांचा 'टायगर ३' या चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. (Salman Khan)

Katrina Kaif Instagram Story For Salman Khan

यावर्षी सलमानच्या वाढदिवसाचे आयोजन त्याची बहीण अर्पिता खान आणि आयुष शर्मा यांनी त्यांच्या घरी केले होते. संपूर्ण ब्लॅक लूकमध्ये सलमान पार्टीला आले होते. सलमानने पापाराझीसह केक कट केला आणि तिथे उपस्थित असलेल्या सर्वांचे आभार देखील मानले. यावर्षी सलमानच्या बर्थडे पार्टीला शाहरुख खान देखील उपस्थित होता. खूप उशिरा तो पार्टीला पोचला होता. त्यानंतर सलमान आणि शाहरुखनी एकत्र बाहेर येत सलमानसोबत पोज दिल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा उमेदवार ठरला

Sambhajinagar Tourism : संभाजीनगरजवळील ऐतिहासिक अन् सांस्कृतिक खजिना, लहान मुलांसोबत पिकनिकला उत्तम ठिकाण

Pune Crime : पुण्यातील धक्कादायक घटना, गॅस सिलिंडरच्या टाकीने ठेचून हत्या, कारण वाचून थक्क व्हाल

Maharashtra Politics: भाजप आमदार अन् मंत्र्यांना रवींद्र चव्हाणांचा इशारा, प्रदेशाध्यक्ष का संतापले?

Marathi Actress Wedding : मराठमोळ्या अभिनेत्रीचा थाटात पार पडला लग्नसोहळा, नवऱ्यासोबतचा पहिला फोटो आला समोर

SCROLL FOR NEXT