Kareena Kapoor Pregnancy Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

Kareena Kapoor: करीना कपूरचा व्हायरल व्हिडिओ पाहून ती पुन्हा गरोदर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. नेटकऱ्यांनी कमेंट्समधून शुभेच्छा दिल्या, मात्र अधिकृत माहिती अद्याप नाही.

Shruti Vilas Kadam

Kareena Kapoor Pregnancy: बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. करीना कपूरला आज जीम जवळ स्पॉट करण्यात आल्यानंतर तिचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओमधील तिचा लूक पाहून काही नेटकऱ्यांनी ती पुन्हा गरोदर आहे का, असा अंदाज व्यक्त केला आहे.

करीना कपूरचा व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये करीना कपूर जिममधून बाहेर पडताना दिसत आहे. यावेळी तिने काळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. तिच्या पोटाचा भाग काहीसा फुगीर दिसत असल्याने नेटकऱ्यांचे लक्ष त्याकडे वेधले गेले. विशेष म्हणजे, करीना कारच्या जवळ जात असताना तिचा गार्ड्सने छत्रीच्या साहाय्याने तिचं पोट लपवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे अभिनेत्रीच्या प्रेग्नन्सीच्या चर्चांना आणखी उधाण आलं आहे.

नेटकऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडिया युजर्सनी विविध कमेंट्स केल्या आहेत. काहींनी थेट करीना गरोदर आहे का, असा प्रश्न विचारला. तर काही युजर्सनी तिच्या तिसऱ्या बाळासाठी शुभेच्छा देत आहेत. मात्र, या चर्चेला सध्या केवळ सोशल मीडिया चर्चेपुरतंच महत्त्व आहे. करीना कपूर किंवा तिच्या कुटुंबाकडून तिसऱ्या बाळाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

सैफ-करीनाला दोन मुलं

करीना कपूरने १६ ऑक्टोबर २०१२ रोजी अभिनेता सैफ अली खानसोबत लग्न केलं. ‘टशन’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. काही वर्षे डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. करीना आणि सैफ यांना तैमूर अली खान आणि जहांगीर अली खान अशी दोन मुलं आहेत.

करीना शेवटची ‘सिंघम अगेन’मध्ये

करीना कपूरच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, ती शेवटची २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सिंघम अगेन’ या चित्रपटात दिसली होती. दुसरीकडे, सैफ अली खान आगामी ‘हैवान’ या चित्रपटात अक्षय कुमारसोबत दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौदावा दिवस, प्रकृती खालावली

Manoj Jarange : मनोज जरांगेंवर ₹१,००० कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप, ED कडे तक्रार दाखल

Morning Meditation Benefits: सकाळी 5 मिनिटे ध्यान केल्याने शरीर आणि मनावर काय परिणाम होतो?

Shocking : भीषण अग्नितांडव! दोन शाळा जळून खाक, २९ जणांचा मृत्यू

मोठी बातमी: सणासुदीत महाप्रसाद, भंडाऱ्याचे आयोजन करताय? परवानगी कशी घ्याल? जाणून घ्या सोपी प्रक्रिया

SCROLL FOR NEXT