Kangana Ranaut and Tunisha Sharma Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut: टुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणात कंगना रनौतचे मोठे वक्तव्य, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे 'ही' मागणी

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने सांगितले टुनिशा शर्माच्या आत्महत्याचे कारण.

Pooja Dange

Kangana Ranaut Reacts To Tunisha Sharma's Death: टीव्ही अभिनेत्री टुनिशा शर्मा हिच्या आत्महत्येने सर्वांना हादरलेले आहे. २० वर्षीय अभिनेत्रीने तिच्या सहकलाकाराच्या मेकअप रूममध्ये गळफास लावून आत्महत्या केली. २४ डिसेंबर २०२२ ला अभिनेत्री टुनिशा शर्माने स्वतःचे जीवन संपवले. अभिनेत्रीच्या मृत्यूची अनेक कारणे समोर येत आहेत.

अनेक सेलिब्रिटी पुढे येऊन टुनिशाच्या मृत्यूवर हळहळ व्यक्त करत आहेत. आता यात बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने पुढे येत भारतीय महिला सुरक्षा कायद्यात सुधारणा करण्याचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर मांडला आहे.

अभिनेत्री कंगना रनौतने (Kangana Ranaut) इन्स्टाग्रामवर खूप मोठा मेसेज लिहिला आहे. हा मेसेज कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे तसेच तिने यात टुनिशा शर्मा हा हॅशटॅग देखील वापरला आहे. कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरील मेसेजवर लिहिली आहे की, “एक स्त्री प्रेम, लग्न, नातेसंबंध किंवा अगदी प्रिय व्यक्ती जाणे या सर्व गोष्टींचा सामना करू शकते, परंतु तिच्या प्रेम कथेत प्रेम, ही कधीही सहन करू शकत नाही, दुसऱ्या व्यक्तीसाठी तिचे प्रेम आणि असुरक्षितता हे शोषणाचे फक्त एक सोपे टार्गेट होते, तिचे वास्तव त्या दुसऱ्या व्यक्तींसारखे नव्हते, जो तिचा वापर फक्त शारीरिक आणि भावनिक अत्याचार करण्यासाठी करत होता."

“तिच्या स्वतःच्या समजुतीवर विश्वास ठेवता येत नाही अशा अवस्थेत तिला जिवंत किंवा मृत असण्यात काहीच फरक वाटत नाही, ही आपली समज आहे. आणि जर तिने आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेतला तर… कृपया हे जाणून घ्या की तिने हे एकट्याने केले नाही… ही एक हत्या आहे.”

कंगनाने पंतप्रधान मोदींना भारतातील महिला कायद्यांमध्ये सुधारणा करण्याचे आवाहन केले. “मी माननीय पंतप्रधान @nsrendramodi जींना विनंती करतो… जसा द्रौपदीसाठी कृष्णाने गुलाब केला जसा रामांनी सीतेसाठी भूमिका घेतली, तशीच आमची अपेक्षा आहे की स्त्रियांवर अॅसिड हल्ले करणारे, त्यांचे तुकडे तुकडे करून त्यांना मारणारे यांच्याविरोधात तुम्ही कठोर कायदे कराल. खटल्याशिवाय तात्काळ फाशीची शिक्षा द्या, ”अशी भावना कंगनाने व्यक्त केली आहे. (Narendra Modi)

Kangana Ranaut Instagram Story

अभिनेत्री कंगना रनौतने या सर्व प्रकरणांवर असा निष्कर्ष काढला आहे की, भावना संवेदनशील नसलेल्या व्यक्तीसाठी कदाचित मजेदार असू शकते, परंतु अत्यंत संवेदनशील असलेल्या व्यक्तीला ते सहजदुखवू शकते आणि हानी पोहचू शकते.

टीव्ही अभिनेत्री टुनिशा शर्मा हिचे २४ डिसेंबर रोजी निधन झाले. टुनिशा शर्माला तिच्या सहकलाकाराच्या रूममध्ये गळफास लावला होता. सेटवरील क्रूने तिला ताबडतोब जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेले, पण हॉस्पिटलला पोहचताच अभिनेत्रीला डॉक्टरांनी मृत घोषित केले. टुनिशाच्या आईने शीझानविरुद्ध एफआयआर दाखल केला असून अभिनेत्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: एसटी महामंडळाकडून भाडेवाढ रद्द

Liver Damage Causes: दारू न पिताही लिव्हर खराब करतात 'या' सवयी; वेळीच व्हा सावध

Nilesh Ghaywal: निलेश घायवळचं लंडन पलायन, पासपोर्ट प्रकरणावर चंद्रकांत पाटलांची चुप्पी, धंगेकरांना वेगळीच शंका

Uddhav Thackeray : शेतकरी भाजपमध्ये आले तर कर्जमाफी? दसरा मेळाव्याआधी उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना टोला

Dasara 2025: दसऱ्याला झेंडूची फुले का वापरली जातात? धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व

SCROLL FOR NEXT