Veteran Actress Tanuja Discharged From The Hospital Instagram
मनोरंजन बातम्या

Tanuja Discharged: ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, चाहत्यांना दिलासा

Actress Tanuja Discharged: ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांना रविवारी सायंकाळी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा झाल्यामुळे रुग्णालयामधून सोमवारी रात्री उशिरा डिस्चार्ज मिळाला आहे.

Chetan Bodke

Veteran Actress Tanuja Discharged From The Hospital

ज्येष्ठ अभिनेत्री आणि काजोलची आई तनुजा यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे त्यांना रविवारी सायंकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वयोमानानुसार उद्भवत असणाऱ्या काही आजारांमुळे त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केलं होतं. सूत्रांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, त्यांना सोमवारी रात्री उशिरा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अभिनेत्री तनुजा यांना रविवारी सायंकाळी मुंबईतल्या जुहूमधील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. वयोमानानुसार उद्भवत असलेल्या आजारांमुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. तनुजा आजारपणातून ठणठणीत बऱ्या होण्यासाठी त्यांचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यामतून प्रार्थना करीत होते. तनुजा यांच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच दिलासादायक बातमी आहे. त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयामधून सोमवारी रात्री उशिरा डिस्चार्ज मिळाल्याची माहिती सुत्रांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिली. (Actress)

तनुजा यांचा २३ सप्टेंबर १९४३ रोजी जन्म झाला आहे. बॉलिवूडची चुलबुली म्हणून तनुजा यांची सर्वत्र ओळख आहे. अभिनेत्रीने अवघ्या लहान वयातच आपल्या अभिनयाने सर्वांना चकित केले. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी तनुजा यांनी 'छबिली' या पहिल्या चित्रपटामध्ये काम केले होते. त्यांचा हा पहिला चित्रपट १९६० मध्ये रिलीज झाला होता. तनुजा यांनी फक्त हिंदीच नाही तर, बंगाली चित्रपटांमध्येही काम केले आहे. चित्रपट निर्माते कुमारसेन समर्थ आणि अभिनेत्री शोभना समर्थ यांची तनुजा समर्थ मुलगी आहे. (Bollywood Film)

तनुजा यांनी 'बहारें फिर भी आएंगी', 'ज्वेल थीफ', 'हाथी मेरे साथी' आणि 'मेरे जीवन साथी' सारख्या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. तनुजा यांनी अनेक बंगाली चित्रपटामध्ये काम केले आहे. तनुजा यांची आणि निर्माते शोमू मुखर्जी यांची 'एक बार मुस्कुरा दो' चित्रपटाच्या निमित्ताने भेट झाली होती. तनुजा आणि चित्रपट निर्माते शोमू मुखर्जी यांनी १९७३ मध्ये लग्नगाठ बांधली होती. शोमू मुखर्जी आणि तनुजा यांना काजोल मुखर्जी आणि तनिषा मुखर्जी अशा दोन मुली आहेत. त्यातील काजल आज बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक असून तनिषा मुखर्जीला खास ओळख मिळाली नाही. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Government: आता विधवांना संबोधलं जाईल 'एकल महिला', महाराष्ट्र सरकारची नवी योजना

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

SCROLL FOR NEXT