Janhvi Kapoor Saam TV
मनोरंजन बातम्या

Workout Tips: जान्हवी कपूरसारखे स्लिम दिसायचे आहे? तर, आजच फॉलो करा 'हा' डाएट प्लॅन

जान्हवी कपूर योगा, वर्कआउट आणि पिलेट्स करते. यासंबंधीची माहिती तिने तिच्या इंस्टाग्रामवरुन दिली आहे.

Jagdish Patil

Workout Tips: आपल्या प्रत्येकाला कोणती ना कोणती अभिनेत्री आवडत असते. आपणही तिच्यासारखे दिसावे असा अट्टाहास आपल्यापैकी अनेकांचा असतो. दिवसभराच्या कामाचा ताणात आपणही फिट आणि ऊर्जावान राहावे असे प्रत्येकाला वाटते.

गुडलक जेरीची अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या वर्कआउट रूटीन आणि डाएटमुळे नेहमीच चर्चेत असते. बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने (Janhvi Kapoor) फार कमी वेळात चित्रपटसृष्टीत आपले नाव कमावले आहे. जान्हवी कपूर तिची सर्व ऊर्जा अभिनय आणि फिटनेसवर खर्च करते.

Janhvi Kapoor

जान्हवी कपूर योगा, वर्कआउट आणि पिलेट्स करते. यासंबंधीची माहिती तिने तिच्या इंस्टाग्रामवरुन दिली आहे. जान्हवी कपूरने तिच्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत वर्कआउट रूटीन आणि फिटनेसबद्दल सांगितले आहे. तिने सांगितले की ती योगा, पिलेट्स आणि अँटी ग्रॅव्हिटी चॅलेंज (Pilates and the Anti-Gravity Challenge) करते आणि ती तिच्या वर्कआउट सेशनबद्दल खूप उत्साहित आहे.

Janhvi Kapoor

तिने सांगितले की गेल्या २ महिन्यांपासून ती कडक डाएटवर आहे जेणेकरून ती मिस्टर आणि मिसेस माहीची तयारी करू शकेल. जरी त्यापूर्वी ती कडक डाएटवर नव्हती तरी तिच्या खाण्यापिण्याच्या सवयी या वेगळ्या होत्या.

तसेच जान्हवी ही चांगली डान्सर देखील आहे. जान्हवी जेव्हा जिममध्ये जात नाही तेव्हा सक्रिय राहण्यासाठी ती स्विमिंग आणि जॉगिंग करते. वेट ट्रेनिंग सोबतच तिच्या आहारात ताजी फळे आणि भाज्यांचा समावेश आहे. जान्हवी कपूर दुपारच्या जेवणात ब्राऊन राइस, अंड्याचा पांढरा भाग आणि सलाड खाते. रात्रीच्या जेवणात ती उकडलेल्या भाज्या खाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daily Wear Mangalsutra: डेली वेअरसाठी छोटे, नाजूक मंगळसूत्र, हे आहेत ट्रेडिंग 5 पॅटर्न

कुत्र्यासोबत अनैसर्गिक कृत्य; विकृत घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

बीडमध्ये पुन्हा खळबळ; लॉजमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू

लोकलच्या डब्याला लागली आग; प्रवाशांची उडाली धावपळ, VIDEO

PAK vs NZ: सुपर-8 च्या पहिल्याच सामन्यात पावसाची फटकेबाजी; सामना रद्द, कोणत्या संघाच्या स्वप्नावर फेरलं पाणी?

SCROLL FOR NEXT