Janhavi Kapoor And  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Janhavi Kapoor: जान्हवी करते 'या' माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवला डेट, फोटो पाहता साऱ्यांच्या भुवया उंचावल्या

दिवाळीनिमित्त जान्हवी आपल्या एक्स बॉयफ्रेंडसोबत दिसल्याने साऱ्यांच्याच भूवया उंचावल्या आहेत. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Janhavi Kapoor And Shikhar Pahadiya Dating: दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची (Shridevi) लेक जान्हवी कपूर सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. आईच्या निधनानंतर तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. बॉलिवूड क्षेत्रात तिने आपला ठसा अल्पावधीतच उमटवला. त्यामुळे तिच्या कामाची चर्चा बॉलिवूडमध्ये रंगलेली दिसते. सोबतच चाहते तिच्या अभिनयामुळे प्रेमात पडले आहे. नुकतीच जान्हवी दिवाळीच्या पार्ट्यांमधून पापाराझींच्या समोर आली होती.

सध्या ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. (Janhvi Kapoor) दिवाळीनिमित्त जान्हवी आपल्या एक्स बॉयफ्रेंडसोबत दिसल्याने साऱ्यांच्याच भूवया उंचावल्या आहेत. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' रिअॅलिटी शोमध्ये जान्हवी आणि शिकारच्या प्रेमाचा दबक्या आवाजात उलगडा केला होता. एका चित्रपट निर्मात्याने जान्हवी आणि साराने त्याच्या इमारतीत राहणाऱ्या वीर पहारिया आणि शिखर पहारियाला (Shikhar Pahariya) डेट केल्याने चर्चा रंगली होती.

व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओत जान्हवी कपूरचा एक्स बॉयफ्रेंड शिखर पहाडियासोबत पहिल्यांदाच एकत्र फिरताना दिसली. व्हायरल झालेल्या व्हिडिओत गुलाबी रंगाच्या सूटमध्ये हॉटेलच्या बाहेर येताना दिसत आहे. दरम्यान जान्हवी पापाराझींकडे पाहत हसत गाडीमध्ये जाऊन बसली.

त्यावेळी गाडीचा ड्रायव्हर तिचा एक्स बॉयफ्रेंड होता. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या रिलेशनची चर्चा रंगत आहे. दिवाळीनिमित्त ही जोडी एकत्र आल्याने त्यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे आणि सोबतच व्हिडिओही व्हायरल होत आहे.

शिखर पहारिया महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांचा नातू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ते दोघेही एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा होत होती पण नंतर त्यांनी विभक्त निर्णय घेतला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी काँग्रेसला पोलिसांनी दिली परवानगी

Healthy Lifestyle : तुमच्या वयानुसार शरीराला किती प्रोटीनची गरज आहे? जाणून घ्या योग्य प्रमाण

Curly Hair Care Tips : रोज स्ट्रेटनर वापरून कंटाळलात? करा हे सोपे उपाय; कुरळे केस होतील स्ट्रेट

Spain Migrants: स्पेनमध्ये समुद्रमार्गे हजारो नागरिकांची घुसघोरी, परिस्थिती चिघळली; १८ जणांचा मृत्यू, थरारक VIDEO

Gold Price Today : सलग दुसऱ्या सोन्याने घतली उसळी, प्रति तोळा इतक्या रुपयांवर दर पोहोचला; वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचे दर

SCROLL FOR NEXT