Jacqueline Fernandez Buys New Home Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jacqueline Fernandez Buys New Home: जॅकलिन फर्नांडिसने मुंबईत घेतलं नवं कोरं घर, किंमत ऐकून बसेल ४४० व्होल्टेजचा झटका

Jacqueline Fernandez News: नुकतंच अभिनेत्रीने मुंबईत नवीन घर घेतलं असून तिच्या नव्या घराची व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Chetan Bodke

Jacqueline Fernandez Mumbai Buys New Home: बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ती गेल्या काही दिवसांपूर्वी सुकेश चंद्रशेखर मनी लॉनड्रिंग प्रकरणामुळे कमालीची चर्चेत आली होती. पण यावेळी जॅकलिन एका वेगळ्याच कारणामुळे सध्या चर्चेत आली आहे. नुकतंच अभिनेत्रीने बांद्र्यात नवीन घर घेतलं आहे. सध्या तिच्या नव्या घराची व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

बॉलिवूडमधील अनेक कलाकार वांद्र्यातील पाली हिलमध्ये राहतात. काही दिवसांपूर्वी दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांनी सुद्धा पाली हील येथे नवीन घर घेतलं असून त्यांच्या नव्या ड्रीम हाऊसचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता त्याच परिसरात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने देखील नवं आलिशान घर घेतलं आहे. नुकताच तिच्या नव्या घराचा व्हिडीओ ‘विरल भयानी’ या सेलिब्रिटी फोटोग्राफरने शेअर केला आहे. तिच्या या नव्या घराचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

‘टाइम नाउ’ या इंग्रजी संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, जॅकलिनचं नवं अलिशान घर हे रणबीर कपूर, करीना कपूर यांच्या घराशेजारीच आहे. तसेच जॅकलिनच्या घराच्या हाकेच्या अंतरावरच सलमान खान आणि शाहरुख खानचंही घर आहे. सध्या अभिनेत्रीने नवीन घर घेतल्यामुळे तिच्यावर अनेक चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, जॅकलिनचं नवं अलिशान घर पाली हिलमधील नवरोज बिल्डिंगमध्ये आहे. या बिल्डिंगमध्ये सर्वांचीच घरं १११९ स्क्वेअर फूट ते २,५५७ स्क्वेअर फूट कार्पेट इतक्या एरियाची घरे आहेत. या अपार्टमेंटमध्ये सर्वच घरे ३ बीएचके आणि ४ बीएचके अशी आहेत. या अपार्टमेंटमध्ये एका घराची किंमत १२ कोटी रुपयांपासून सुरू होते. शिवाय इथे क्लब हाऊस, स्विमिंग पूल व जिम अशा अनेक महत्त्वाच्या सुविधाही आहेत.

जॅकलिनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, लवकरच अभिनेत्री ‘फतेह’ या चित्रपटात दिसणार असून तिच्या सोबत चित्रपटात अभिनेता सोनू सूद व विजय राज हे दोन सेलिब्रिटी दिसणार आहेत. सोबतच अभिनेत्री आणखी एका चित्रपटात झळकणार आहे. आदित्य दत्तच्या ‘क्रॅक जितेगा तो जिएगा’ या चित्रपटात देखील ती प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटामध्ये जॅकलिनबरोबर विद्युत जामवाला व अर्जुन रामपाल हे दोन दिग्गज सेलिब्रिटी देखील दिसणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

Gautami Patil : गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात बोल्ड अन् ग्लॅमरस अंदाज, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'कडक'

SCROLL FOR NEXT