Ileana D'Cruz Shared New Born Baby Photo Instagram
मनोरंजन बातम्या

Ileana D'Cruz Shared New Born Baby Photo: इलियाना डिक्रूझने दिला गोंडस बाळाला जन्म, फोटो शेअर करत सांगितलं बाळाचं नाव

Ileana Dcru'z Son First Photo: अभिनेत्री इलियाना डिक्रूझ हिने नुकताच गोंडस बाळाला जन्म दिला आहे. अभिनेत्रीने आता बाळाचा पहिला फोटो आणि त्याचं नाव चाहत्यांना सांगितले आहे.

Chetan Bodke

Ileana D'cruz Delivered A Baby Boy: बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझने नुकतीच चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. अभिनेत्रीने १ ऑगस्ट रोजी एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना बाळाची ही गोड बातमी दिली आहे. अभिनेत्रीने गोड बातमी शेअर करताच तिच्यावर चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. अभिनेत्रीने चाहत्यांसोबत काल अर्थात ५ ऑगस्ट रोजी ही बातमी शेअर केली आहे. इलियानाने पोस्ट शेअर करताना बाळाचा पहिला फोटो आणि नावही शेअर केलं आहे. (Bollywood Actress)

इलियाना डिक्रूझने बाळाचा फोटो शेअर करत बाळाचे नावही चाहत्यांना सांगितले. इलियानाच्या बाळाचे नाव कोआ फीनिक्स डोलन असं नाव आहे. अभिनेत्रीने बाळाला १ ऑगस्ट रोजी जन्म दिला आहे.

बाळाचा फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शन दिले की, ‘आम्हाला आमच्या बाळाचे स्वागत करताना, खूपच आनंद होत आहे. बाळाचे स्वागत करतानाचा आनंद आम्ही शब्दात व्यक्त करू शकत नाही. मी खूपच आनंदी आहे.’ अशी कॅप्शन देत अभिनेत्रीने ही पोस्च शेअर केली. अभिनेत्रीच्या या पोस्टवर अनेक युजर्सने लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

अभिनेत्री इलियाना डिक्रूझने १८ एप्रिल रोजी तिने सोशल मीडियावर गुड न्यूज शेअर केली होती. अनेकदा अभिनेत्रीने बेबी बंप फोटोज ही शेअर केले होते. काही दिवसांपूर्वी इलियानाने काही फोटो शेअर केले होते, त्यातील पहिल्या फोटोत लहान बाळाचे कपडे होते. त्या ड्रेसवर ‘आता साहसी प्रवास सुरू होणार आहे.’ अशा आशयाचा मजकूर त्यावर लिहिला होता. तर, दुसऱ्या फोटोत तिच्या गळ्यातील क्युट लॉकेट होते. ज्यावर ‘ममा’ असं लिहिलं होतं.

अभिनेत्रीने ते फोटो शेअर करताना कॅप्शन दिलं होतं की, ‘माझं गोंडस बाळ लवकरच येत आहे, तुला भेटण्यासाठी आता मी फार काळ वाट पाहू शकत नाही.’ अशा आशयाची पोस्ट अभिनेत्रीने केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Primer Or Foundation: प्रायमर की फाउंडेशन, मेकअप करताना सर्वातआधी काय लावावे?

Maharashtra News Live Update: नंदुरबारच्या खोडाईमाता यात्रेत अन्न प्रशासनाची धडक कारवाई; 1 लाखांहून अधिक किमतीची मिठाई जप्त

मोठी बातमी! भाजप बड्या नेत्याचे हात-पाय बांधले, घरातच बनवलं बंधक; चोरट्यांनी ५० लाखांवर मारला डल्ला

Accident News : महामार्गावर भीषण अपघात! दुचाकींच्या धडकेत ३ जणांचा दुर्दैवी मृत्यू; मृतांमध्ये शिक्षकांचा समावेश

Bladder cancer in dogs: 6 महिन्यांपासून लघवीतून रक्तस्राव, तपासणीत कॅन्सरचं निदान; डॉक्टरांकडून श्वानावर यशस्वी शस्त्रक्रिया

SCROLL FOR NEXT