Kanguva SAAM TV
मनोरंजन बातम्या

Kanguva : दिशा पटानीने एका गाण्यासाठी २१ वेळा बदलले कपडे..., 'कंगुवा' मधील 'योलो' गाण्याच्या शुटिंगचा खास किस्सा

Disha Patani : साऊथ स्टार सूर्या आणि बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल मुख्य भूमिकेत असलेला 'कंगुवा' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात दिशा पटानीने गाण्याच्या शूटिंगचा एक खास अनुभव शेअर केला आहे.

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिचा सोशल मिडियावर मोठा चाहता वर्ग आहे. आता दिशा पटानी'कंगुवा' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

'कंगुवा' (Kanguva) चित्रपटात साऊथ स्टार सूर्या आणि बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. 'कंगुवा' चित्रपट आज म्हणजे (14 नोव्हेंबर) ला प्रेक्षकांच्या भेटाला आला आहे. 'कंगुवा'चित्रपटात जबरदस्त ॲक्शन पाहायला मिळणार आहे. तसेच 'कंगुवा' चित्रपटाची गाणी प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहेत. 'कंगुवा' चित्रपटातील 'योलो' गाण्यासाठी दिशा पटानीने तब्बल २१ वेळा कपडे बदलले आहेत.

एका मिडिया मुलाखतीत दिशा पटानीने (Disha Patani) चित्रपटातील गाण्याच्या शूटिंगचा किस्सा सांगितला आहे. हा किस्सा 'कंगुवा'मधील येलो गाण्याचा आहे. तिने मुलाखतीत सांगितले की, 'योलो' गाण्यासाठी मी तब्बल २१ वेळा कपडे बदलले आहे. 'कंगुवा' चित्रपटाचे शूटिंग ७ वेगवेगळ्या देशात झालं आहे. यात भारताचाही समावेश आहे. 'योलो' गाण्याच्या चित्रीकरणाला ४ दिवस लागले होते.

'कंगुवा' चित्रपट ३५० कोटींच्या बजेटमध्ये तयार झाला आहे. 'कंगुवा' चित्रपटात सूर्या, बॉबी देओल, दिशा पटानी हे मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहेत. हा तमिळ ड्रामा आहे. जो १० भाषांमध्ये रिलीज झाला आहे. 'कंगुवा' चित्रपट ३डी मध्येही पाहता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Milk : दूध फाटलं? नो टेंन्शन! 'अशा' ५ प्रकारे करा वापर, भन्नाट ट्रिक आताच लिहून घ्या

Chhatrapati shivaji maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांची दुर्मिळ चित्र पाहिलीत का? बघा जगभरातील वस्तूसंग्रहालयात जतन केलेली चित्र

Maharashtra Live News Update : दहिसरहुन गुंदवलीला येणाऱ्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड

Ajit pawar Death : रोहितची काळजी वाटते, सरकारने सुरक्षेची जबाबदारी घ्यावी; सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Kalyan : कल्याणमध्ये दोन गटात तुफान हाणामारी, दोघे गंभीर जखमी; परिसरात तणावपूर्वक वातावरण

SCROLL FOR NEXT