Deepika Padukone Saam Tv
मनोरंजन बातम्या

Deepika Padukone: दीपिकाची दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत एन्ट्री ; 'या' सुप्रसिध्द दिग्दर्शकांसोबत करणार काम

चित्रपटात मुख्य भूमिकेत महेश बाबू आणि सोबत बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण दिसणार आहे. राजामौली यांच्या नव्या चित्रपटाची सर्व स्तरात चर्चा होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: अख्ख्या भारताला दाक्षिणात्य चित्रपटाची (Tollywood) भूरळ पडली आहे. त्या चित्रपटांमध्ये कलाकारांचा अभिनय आणि त्यांची कलाकृती सर्वांना खूप आवडते. बाहुबली, आर.आर.आर चित्रपटाच्या भरघोस यशानंतर एस.एस.राजमौलीच्या (Bollywood) एका नव्या चित्रपटाची चर्चा सुरू झाली आहे. दिग्दर्शक एस.एस.राजमौलींचे चित्रपट पाहण्यासाठी या क्षेत्रातील दिग्गजांसह चाहत्यांनाही खूपच उत्सुकता असते. या चित्रपटाच्या कामाला नुकतीच सुरुवात केली असली तरी चित्रपटाला तात्पुरते नाव देण्यात आले आहे. निर्मात्यांनी चित्रपटाला तात्पुरते पण विशेष 'एसएसएमबी29' असे नाव दिले आहे. (Marathi Entertainment News)

चित्रपटप्रेमींना भारदस्त चित्रपट दिल्यानंतर त्यांच्या आगामी चित्रपटाची सध्या चर्चा होत आहे. नव्या चित्रपटांची माहिती जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतूर असतात. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटात मुख्य भूमिकेत महेश बाबू आणि सोबत बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण दिसणार आहे. राजामौली यांच्या नव्या चित्रपटाची सर्व स्तरात चर्चा होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाची टीम दीपिकासोबत चित्रपटाविषयी चर्चा करत आहेत. परंतू चित्रपटात महेशसोबत दीपिकाला सुद्धा अप्रोच करण्यात आले की नाही याबाबत सध्या कोणतीही माहिती मिळालेली नाही. तसेच अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा ही करण्यात आलेली नाही. (Bollywood Actress)

एसएस राजामौली यांच्या आगामी चित्रपटात महेश बाबू आणि दीपिका पदुकोण दोघेही पहिल्यांदाच स्क्रिनवर एकत्र दिसणार आहेत. कदाचित असे घडले तरी ही प्रेक्षकांसाठी आनंदाची गोष्ट ठरेल. कारण याआधी दोघांनी कधीही एकत्र काम केले नाही. या चित्रपटाव्यतिरिक्त, दीपिकाला दिग्दर्शक नाग अश्विनच्या चित्रपटासाठी देखील संपर्क साधण्यात आला आहे. ज्यामध्ये ती बाहुबली फेम प्रभाससोबत दिसणार आहे.

या चित्रपटाशी निगडित लेखक विजेंद्र प्रसादने एका वेबपोर्टलसोबत बोलताना सांगितले की, हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. चित्रपटाची कथा अॅडवेंचरवर आधारित आहे. या चित्रपटाची शूटिंग पुढील वर्षी सुरू होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा महेश बाबूंशी या चित्रपटाबद्दल बोलण्यात आले तेव्हा तो म्हणाला की, सध्या तरी चित्रपटाबद्दल बोलणे खूप घाईचे होईल, जर असे घडले तर स्वप्न सत्यात उतरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागात वादळी पावसाचे थैमान

Gold Price Today: सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठा बदल, वाचा २२ अन् २४ कॅरटचे आजचे दर

Namo Shetakri Yojana: शेतकऱ्यांनो नमो शेतकरी योजनेचे ₹२००० मिळाले का? अशा पद्धतीने चेक करा स्टेट्स

नांदेडमध्ये रक्तरंजित थरार ! गँगवारमध्ये तिघांचा मृत्यू, शहरात दहशत

Dandruff Home Remedy : केस धुवण्यापूर्वी करा 'हे' काम, टाळूला येणार नाही खाज अन् कोंडाही होईल गायब

SCROLL FOR NEXT