Bollywood Actress Saam Tv
मनोरंजन बातम्या

बॉलिवूडधील 'या' कलाकारांची जन्मभूमी परदेशी, तर कर्मभूमी भारत

भारतातील हिंदी चित्रपटसृष्टीतील बरेच अभिनेत्री परदेशात जन्मले आहेत. जरी त्यांची कर्मभूमी भारत असला तरी जन्मभूमी परदेश आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bollywood Actress Born In Foreign Country: फॅन्स आणि सेलिब्रिटींचं नातं खूप वेगळं आहे. फॅन्सना आपल्या आवडत्या कलाकाराबद्दल काही खास माहिती जाणून घेण्याची फार इच्छा असते. आपल्या आवडत्या कलाकाराचा त्यांचा जन्म कुठे झालाय? त्यांचे शिक्षण कुठे झाले आहे? इथपर्यंतची माहिती चाहते जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. भारतातील असे बरेच कलाकारमंडळी आहेत की, जे भारतात जन्मले नाहीत मात्र भारतात काम करत आहे.

काही दिवसांपूर्वी अक्षय कुमार एका कार्यक्रमात सहभागी झाला होता. जिथे त्याने त्याच्या चित्रपटांसोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि त्याच्या नागरिकत्वावरही काही विधाने केली. अनेक ट्रोलर्स अक्षय कुमारला त्याच्या नागरिकत्वाबद्दल ट्रोल करत असतात.

सोशल मीडियावर त्याला कॅनडा कुमार असेही बोलतात. अक्षयकडे कॅनडाचे नागरिकत्व असून अक्षय हा पहिलाच असा सेलिब्रिटी नाही, ज्याच्याकडे परदेशी नागरिकत्व आहे. या यादीत अनेक स्टार्सचा समावेश आहे.

बॉलिवूडची मस्तानी गर्ल दीपिका पदुकोण भारतात जन्मली नसून डेन्मार्कच्या कोपनहेगनमध्ये तिचा जन्म झाला आहे. त्यावेळी वडिलांच्या कामानिमित्त तिचं संपूर्ण कुटूंब डेन्मार्कला होतं.

अलीकडेच आई झालेली अभिनेत्री आलिया भट्ट हिचा लंडनमध्ये जन्म झाला होता. मात्र, जन्मानंतर लगेचच अभिनेत्री तिच्या पालकांसह भारतात आली. आई सोनी राजदान यांच्याप्रमाणेच आलियाकडेही ब्रिटिश पासपोर्ट आहे.

आमिर खानचा पुतण्या आणि अभिनेता इम्रान खान याचा जन्म अमेरिकेच्या विस्कॉन्सिन राज्याची राजधानी मॅडिसन येथे झाला. इम्रानचे आई-वडील एकमेकांपासून विभक्त झाल्यानंतर तो भारतात परतला. गेल्या काही वर्षांपासून हा अभिनेता चित्रपटसृष्टीपासून दूर आहे.

अनेक बॉलिवूड चित्रपट आणि आयटम साँगमध्ये दिसलेली अभिनेत्री सनी लिओनीचा जन्म कॅनडामध्ये झाला. गेल्या अनेक वर्षांपासून सनी आपल्या कुटुंबासह भारतात राहत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shraddha kapoor: श्रद्धा कपूरचा ऑफ-शोल्डर ग्लॅमरस लूक पाहिलात का?

Bread Recipe: मुलांसाठी झटपट घरीच ब्रेडपासून बनवा 'हे' पदार्थ, रेसिपी वाचाच

छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकून चूक केली का? संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले? VIDEO

Pune Crime : पुण्यात पुन्हा सैराट! प्रेमविवाह केल्याचा प्रचंड राग, सेटर लावून सलूनच्या दुकानात घुसून जीवघेणा हल्ला

Bullet Train प्रकल्पाचे काम सुस्साट, BKC स्टेशनचे काम ८० टक्के पूर्ण; NHSRCLची मोठी माहिती

SCROLL FOR NEXT