Deepika Padukone Funny Video Instagram
मनोरंजन बातम्या

Deepika Padukone Funny Video:‘जस्ट लुकिंग लाइक अ वॉव...’ची भुरळ दीपिका पदुकोणलाही, ‘या’ प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रींनीही शेअर केली रिल

Deepika Padukone News: दीपिकाने चाहत्यांसोबत सोशल मीडियावर एक हटके व्हिडीओ शेअर केला आहे.

Chetan Bodke

Deepika Padukone Funny Video

दीपिका- रणवीर सध्या ‘कॉफी विथ करण- ८’ मुळे कमालीचे चर्चेत आहेत. त्यांनी केलेल्या अनेक खुलाश्यानंतर सोशल मीडियावर त्यांना ट्रोल सुद्धा करण्यात आले आहे. अशातच सध्या दीपिका एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. अनेक सेलिब्रिटी चाहत्यांसोबत सोशल मीडियावर ट्रेंड प्रमाणे व्हिडीओ शेअर करत असतात. अशातच दीपिकाने चाहत्यांसोबत एक ट्रेंडिंग व्हिडीओ शेअर केला आहे. ‘सो एलिगेंट, सो ब्यूटिफुल, जस्ट लुकिंग लाइक अ वॉव...’ असं म्हणत अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर केला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गुरुवारी ‘कॉफी विथ करण- ८’ या शोमध्ये हजेरी लावल्यापासून तिची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. दोघांनीही शोमध्ये केलेल्या अनेक खुलाश्यांमुळे त्यांना चाहते, प्रचंड ट्रोल करीत आहे. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी ‘कॉफी विथ करण- ८’ मध्ये त्यांच्या रिलेशनबद्दल अनेक महत्वाचे खुलासे केले आहेत.

नुकताच दीपिकाने सोशल मीडियावर एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती ‘जस्ट लुकिंग लाइक अ वॉव...’ ट्रेंड फॉलो करताना दिसत आहे. खरंतर हा ट्रेंड दीपिकासह अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनीही फॉलो केलेला पाहायला मिळत आहे. (Viral Video)

शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दीपिकाने, डायमंड इयर रिंग्स, पिंक कलरचा ड्रेस, त्यावर बारीक डिझाईन्स पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. ती व्हिडीओमध्ये, ‘सो ब्यूटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाइक अ वॉव, जस्ट लुकिंग लाइक अ वॉव...’ असं म्हणते. रणवीर सिंगने या व्हिडीओवर हसण्याची प्रतिक्रिया दिली आहे. त्यासोबतच तिच्या व्हिडीओवर अनेक सेलिब्रिटींनीही प्रतिक्रिया दिली आहे. (Bollywood Actress)

सध्या या व्हिडीओची नेटकऱ्यांमध्ये प्रचंड चर्चा होत आहे. प्रसिद्ध सोशल मीडिया एन्फ्लूएंसर यशराज मुखातेलाही या गाण्याची भुरळ पडली आहे. तो कायमच सोशल मीडियावर वेगवेगळ्या आशयाच्या व्हिडीओ शेअर करत असतो. त्याने नव्या शैलीमध्ये हे गाणं शेअर केलं असून नेटकऱ्यांना त्याने एडिट केलेलं गाणं प्रचंड आवडले आहे. त्याच्या या गाण्यावर फक्त चाहत्यांनीच नाही तर, काही अभिनेत्रींनीही रिल शेअर केली आहे. (Social Media)

सध्या सोशल मीडियावर 'लूकिंग लाइक वॉव' आणि 'मै फना है माउस कलर' या दोन व्हिडिओ ट्रेंडिंग होत आहे. दीपिका आणि रणवीरने नुकतंच ‘कॉफी विथ करण- ८’च्या नव्या सीझनचे पहिले पाहुणे होते. त्यांचा एपिसोड गुरुवारी ‘हॉटस्टार’वर टेलिकास्ट झाला. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत खळबळ! हायप्रोफाईल एरियात मॉडेलच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

IND T20 WC 2026: शनिवारी टी-२० वर्ल्डकपचा थरार! टीम इंडिया कोणासोबत करणार दोन हात, १५ शिलेदार कोणते, A टू Z माहिती एका क्लिकवर

Mumbai News: IIT बॉम्बेमध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या, हॉस्टेलच्या इमारतीवरून मारली उडी

Video Viral: रिलसाठी काहीपण!!! धावत्या लोकलमध्ये लटकत तरूणीचा स्टंट, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

Maharashtra Live News Update: मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT