Besharam Rang Song Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shah Rukh Khan: शाहरुखच्या कपड्यांनी दिली दीपिकाच्या बिकनीला टक्कर, शूज आणि गॉगलची किंमत वाचून येईल आकडी...

जितकी चर्चा आधी दीपिकाच्या कपड्यांची होती, आता त्याहूनही सर्वाधिक चर्चा शाहरुखच्या कपड्यांची आहे.

Chetan Bodke

Shah Rukh Khan: शाहरुख- दीपिकाचा 'पठान'चा वाद संपता संपत नाही. दररोज नव-नवीन वाद प्रेक्षकांसमोर येत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी चित्रपटातील पहिले गाणे प्रेक्षकांसमोर आले होते. अवघ्या काही तासातच चित्रपटातील पहिलं गाणं सोशल मीडियावर बरेच ट्रोल झाले. या गाण्यावर नेटकऱ्यांनी बरेच मीम्स बनवत त्याला ट्रोल करत आहे.

दीपिकाने गाण्यात अवघ्या काही सेकंदासाठी घातलेल्या या बिकनीने सर्वांचेच लक्ष तिच्याकडे वेधले होते. पण सोबतच आता शाहरुखही त्याच्या महागड्या कपड्यांमुळे कदाचित ट्रोल होण्याची शक्यता आहे. जितकी चर्चा आधी दीपिकाच्या कपड्यांची होती, आता त्याहूनही सर्वाधिक चर्चा शाहरुखच्या कपड्यांची आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुखने आपल्या कपड्यासाठी लाखो रुपयांची उधळण केली आहे. शाहरुखचा या चित्रपटातील काळ्या रंगाचा फ्लोलर प्रिंट असलेल्या AllSaints ब्रॅण्डच्या शर्टची किंमत जेम- तेम ८ हजाराच्या आसपास आहे. तर त्याच्या शूजची किंमत लाखो रुपये आहे. तर त्याच्या गॉगलची किंमत ही हजारोंच्या आसपास आहे.

शाहरुखच्या Eyevan 7285 Model 163(800) Titanium Frame असलेल्या गॉगलची किंमत ४१ हजार इतकी आहे. दीपिकाच्या भगव्या रंगाच्या बिकिनीची चर्चा सर्वत्र होत असताना शाहरुखच्या महागड्या कपड्यांनी सगळ्यांचेच लक्ष वेधले. सध्या सुरू असलेल्या वादाचा आता ‘पठाण’ चित्रपटावर कितपत परिणाम होणार? हे पाहावं लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : तुला घरी नेण्यासाठी कुणी आलं नाही का? पाचवीतल्या चिमुकलीसोबत शिक्षकाचं किळसवाणं कृत्य, रत्नागिरीत खळबळ

Raj Thackeray : माझ्या परवानगीशिवाय कोणाशी बोलू नका, राज ठाकरे यांचा पदाधिकाऱ्यांना आदेश

Pune News : चिमुरडीचा जीव वाचवणारा, फायर ब्रिगेडचा हिरो

Morning Weight loss Drink: रिकाम्या पोटी प्या 'हे' मॉर्निंग सुपरड्रिंक, वजन होईल कमी

मीरारोडला गर्जला मराठी; दिवसभरात नेमकं काय घडलं? मराठीचा एल्गार, मोर्चापूर्वी काय घडलं?

SCROLL FOR NEXT