Bhumi Pednekar  Instagram @bhumipednekar
मनोरंजन बातम्या

Bhumi Pednekar Bold Dress: भूमी पेडणेकरची होतेय उर्फी जावेदशी तुलना, इतका बोल्ड अवतार कधीच पाहिला नसेल!

दिवाळी पार्टीत भूमी पेडणेकर जास्त ग्लॅम, स्टाईल आणि रिव्हिलिंग आउटफिटमध्ये दिसली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bhumi Pednekar Style: बॉलिवूड सेलेब्रिटी सध्या दिवाळी पार्टीमध्ये व्यस्त आहेत. दिवाळीच्या पार्टीतील सेलिब्रिटींची स्टाइल पाहून फॅशन वीक सुरू आहे असेच वाटते. सर्व अभिनेत्री त्यांच्या स्टायलिश लूकमध्ये अप्रतिम दिसत आहेत. परंतु भूमी पेडणेकरच्या प्रत्येक लूकने कहर केला आहे.

भूमीचा इतका बोल्ड अवतार यापूर्वी कधी कोणी पाहिला नव्हता. प्रत्येक दिवाळी पार्टीत, भूमी आधीपेक्षा जास्त ग्लॅम, स्टाईल आणि रिव्हिलिंग आउटफिटमध्ये दिसली. त्यामुळे लोकांना विश्वास करणे कठीण झाले की ही तीच भूमी आहे जी ते आतापर्यंत पाहत होते. सोनम कपूरच्या दिवाळी पार्टीमधील तिच्या ड्रेसच्या चर्चा सध्या सर्वत्र रंगत आहेत.

नुकतीच आई झालेल्या सोनम कपूरनेही दिवाळी निमित्त खास पार्टी आयोजित केली होती. सर्व जवळच्या लोकांव्यतिरिक्त, सर्व बॉलिवूड सेलेब्स देखील तिच्या दिवाळी पार्टीमध्ये सहभागी झाले होते. या पार्टीत अभिनेत्री भूमी पेडणेकरनेही हजेरी लावली होती. जेव्हा भूमी मीडियासमोर पोझ देण्यासाठी आली तेव्हा सर्वांच्या नजर तिच्याकडे खिळल्या होत्या. (Diwali)

व्हाईट कलरच्या आउटफिटमध्ये भूमी पेडणेकरचा एका वेगळ्याच बोल्ड लूक पाहायला मिळाला. या लेहेंगा स्टाइल ड्रेसमध्ये भूमीने चोली किंवा ब्लाउजऐवजी स्ट्रॅपलेस ब्रॅलेट घातला होता. बॅकलेस ड्रेसमध्ये भूमीने जबरदस्त पोज दिल्या. तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Social Media)

सोशल मीडियावर हे फोटो पाहून युजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. भूमीच्या या ड्रेसवर अनेक नकारात्मक कमेंट्स पाहायला मिळत आहेत. तिची ही शैली बहुतेकांना अजिबात आवडलेली नाही. काही यूजर्स तिची तुलना उर्फी जावेदशी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor Death: प्रसिद्ध अभिनेत्याच्या हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या ४७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Maharashtra News Live Update: पालकमंत्री चंद्रकांत पाटलांची घोषणा, मोटेवाडी दुर्घटनेतील मृतांना प्रत्येकी चार लाख मदतीची

नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे पुण्यापर्यंत?

Pune Metro: पुणेकरांच्या कामाची बातमी! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो या दिवशी सुरु होणार, तारीख आली समोर

Sindhudurg : सिंधुदुर्गात खळबळ! बड्या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं, ACB ने मुसक्या आवळल्या

SCROLL FOR NEXT