Athiya KL Rahul  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Athiya अन् KL Rahul च्या घरी येणार नवा पाहुणा, नवी वर्षात होणार आई-बाबा

Athiya KL Rahul Pregnancy Announcement : अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल लवकरच आई-बाबा होणार आहेत. ही आनंदाची त्यांनी सोशल मीडियावर शेअर करून आपल्या चाहत्यांना दिली आहे.

Shreya Maskar

बॉलीवूड सुपरस्टार सुनील शेट्टीची (Suniel Shetty) मुलगी अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि तिचा नवरा भारतीय क्रिकेटर केएल राहुल (Indian cricketer KL Rahul) लवकरच आई-बाबा होणार आहे. ही गोड बातमी त्यांनी आपल्या सोशल मिडिया अकाउंटवर पोस्ट करून दिली आहे.

अथिया आणि केएल राहुल लग्नाच्या दीड वर्षानंतर आपल्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहेत. अथियाने आपल्या सोशल मिडियावर एक खास पोस्ट केली आहे. त्यात असं लिहिलं आहे की, "आमचे सुंदर आशीर्वाद लवकरच येत आहेत...2025" या पोस्टमधून अथिया आणि केएल राहुलने प्रेग्नेंसीची (Athiya KL Rahul Pregnancy Announcement) घोषणा केली आहे. त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तसेच अनेक सेलिब्रिटी आणि क्रिकेटरने त्यांच्या या पोस्टवर कमेंट्स करून शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेत्री अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटर केएल राहुल 2019 पासून एकमेकांना ओळखत होते. अनेक वर्ष ते एकमेकांना डेट करत राहीले आणि अखेर 2023मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली आहे. आता 2025 हे जोडप आई-बाबा होणार आहे.

अथियाचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. तिचे इंस्टाग्रामवर 4.6 मिलियन फॉलोअर्स आहेत. तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. तिने आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. अथिया आपल्या वेगवेगळ्या लूकचे फोटो आणि प्रोजेक्ट संबंधित माहिती इंस्टाग्रामवर शेअर करत असते. केएल राहुल हा भारताचा एक उत्तम क्रिकेटर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर, प्रतिबंधित गुटखा-पानमसाला विक्रेत्यांना दणका; २ दिवसांत 32 आरोपी अटकेत

लग्न समारंभ आटोपून नवविवाहित जोडपं हेलिकॉप्टरनं निघालं अन् क्षणार्धात कोसळलं; नवरदेवाचा मृत्यू

डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी! पिंपळेश्वर मंदिरभूमीसाठी ४ एकर २५ गुंठे जागा मंजूर

Ladki Bahin Yojana: तब्बल1,25,00,000 लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र, नवी आकडेवारी आली समोर

विरोधी पक्षातील २ आमदार तडकाफडकी निलंबित; अचानक नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT