Anushka Sharma Instagarm/ @anushkasharma
मनोरंजन बातम्या

Anushka Sharma: विराट अ‍ॅम्बेसेडर असलेल्या कंपनीवर अनुष्का बरसली, वाचा सविस्तर...

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माची सोशल मीडियावरील एक पोस्ट सध्या प्रचंड चर्चेत आहे.

Pooja Dange

Anushka Sharma On Puma India: बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माची सोशल मीडियावरील एक पोस्ट सध्या प्रचंड चर्चेत आहे. या पोस्टच्या माध्यमातून अनुष्काने एका स्पोर्ट ब्रँडवर नाराज असल्याचे दिसत आहे. तिच्या परवानगीशिवाय एका स्पोर्ट ब्रँडने तिचे फोटो वापरले आहेत.

अनुष्काचे म्हणणे आहे के तिच्या परवानगीशिवाय या स्पोर्ट ब्रँडने तिचे फोटो ब्रँड प्रमोशनसाठी वापरले आहेत. त्या स्पोर्ट कंपनीची ती ब्रँड अॅम्बेसेडर सुद्धा नाहीये. तिने या स्पोर्ट कंपनीला टॅग करत म्हटले आहे की लवकरात लवकर हे फोटो काढून टाका. अनुष्काने ज्या स्पोर्ट ब्रँडला विरोध करत आहे त्याचा ब्रँड अॅम्बेसेडर विराट कोहली आहे.

अनुष्काने तिच्या सोशल मीडिया अकॉऊंट वर स्टोरी शेर केर लिहिले आहे की, 'माझ्या परवानगीशिवाय तुम्ही कुठल्याही ब्रँड पब्लिसिटीसाठी माझे फोटो वापरू शकत नाही. कारण मी तुमच्या कंपनीची ब्रँड अॅम्बेसेडर नाहीये. कृपया ते फोटो काढून टाका.' (Social Media)

सिझन सेलसाठी या कंपनीने अनुष्काच्या फोटोंचा वापर केला आहे. विराट त्या कंपनीचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. त्याने अनुष्काची स्टोरी त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत त्या कंपनीला हे प्रॉब्लेम सोडवायला सांगितला आहे. त्यानंतर कंपनीने दुसरी पोस्ट शेअर करत अनुष्काला कायद्याचा धाक सुद्धा दाखवला आहे. त्यावर अनुष्काने आणखी एक स्टोरी शेअर करत त्यांना उत्तर दिले आहे. (Anushka Sharma)

Anushka Sharma Instagram Story With Puma India Post

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचे 2017 मध्ये लग्न झाले होते. दोघेही जवळपास तीन वर्षे एकमेकांना डेट करत होते. 2021 मध्ये त्यांना मुलगी वामिका झाली. अनुष्का आई झाल्यापासून चित्रपटांपासून दूर होती, मात्र ती लवकरच चकदा एक्सप्रेस या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट माजी भारतीय महिला क्रिकेटपटू झूलन गोस्वामीवर आधारित आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूरमधील चेट्टीनाड कंपनीच्या ट्रान्सफार्मरला भीषण आग

Todays Horoscope: आज या राशींनी ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा, वाचा राशीभविष्य

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

SCROLL FOR NEXT