Alia Bhatt Over Confidence Instagram/@aliaabhatt
मनोरंजन बातम्या

Alia Bhatt Trolled: आलियाला अतिआत्मविश्वास नडला, अभिनेत्रीचं भाषण ऐकून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल...

Alia Bhatt Statement: ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ या चित्रपटामुळे चर्चेत राहिलेली आलिया सध्या एका वक्तव्यामुळे खूपच चर्चेत आली आहे.

Chetan Bodke

Alia Bhatt Over Confidence: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या गेल्या काही दिवसांपूर्वी ती कमालीची चर्चेत आहे. आपल्या अभिनयानेच नाही तर आता ती तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. नुकताच आलिया- रणवीर सिंहच्या ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’चा बहुचर्चित चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला. चित्रपटामुळे चर्चेत राहिलेली आलिया सध्या एका वक्तव्यामुळे खूपच चर्चेत आली आहे.

आलिया म्हणते, “तुम्ही कोणत्याही गोष्टीसाठी जर सक्षम असाल तर तुम्ही हवं तसं करु शकता. तुमची सर्जनशीलताही वाढीस लागते. हे सगळं काही मुलं, समुदाय, समाज यांच्या निकोप वाढीसाठी हे सगळं महत्वाचं आहे.” आलिया हे सर्व इतक्या उत्साहाच्या भरात बोलली की, तिला नेटकऱ्यांनी तुफान ट्रोल केलं. कार्यक्रमाचा विषय आणि तिचे भाषण फारसं मिळतं जुळतं नसल्याने तिला तुफान ट्रोल केलं.

आलियाच्या भाषणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. तिचं भाषण पाहून ट्रोलर्स म्हणतात, “आलिया तुझं पाठांतर खूप चांगलं आहे.” असं म्हणत तिच्या भाषणाची खिल्ली उडवली. तर आणखी एक म्हणतो, “मला असं वाटतंय की, तू खूप चांगली तयारी केली. पण तू जे काही बोलतेय, त्याविषयी तुला काही माहिती आहे की नाही, याचाही विचार करायला हवा. प्रॅक्टिस तर खूप केलीय, पण भाषणात आत्मविश्वासाची थोडी कमतरता होती.” (Trolled)

तर आणखी एक म्हणतो, “महिलांचे सक्षमीकरण झालेच पाहिजे. त्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांना वाचाही फोडली पाहिजे. आपल्या पूर्ण समाज हा अधिक सजग करण्याची गरज आहे. हेही लक्षात घ्यायला हवे.” अशा प्रतिक्रिया आलियाच्या भाषणावर आल्या आहेत. आलियाला हे भाषण चांगलंच अंगलट आलंय.. अशा प्रकारची प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहे. मात्र यासगळ्यात आलिया मोठमोठ्या गप्पा करणं हे चांगलेच महागात पडल्याचे दिसून आले आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pratapgad Fort History: ऐतिहासिक शौर्य, भव्य वास्तुकला असलेले प्रतापगड; जाणून घ्या इतिहास आणि वैशिष्ट्ये

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते नव्या बसांना हिरवा झेंडा

माजी पंतप्रधानांच्या बहिणीवर महिलांचा हल्ला, भर पत्रकार परिषदेत अंडी फेकली, नेमकं कारण काय?

आताच तिकिट बुक करा! दिवळीआधी रेल्वेचं मोठं गिफ्ट, तब्बल ९४४ विशेष गाड्या धावणार, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT