Alia Bhatt Mom Soni Razdan News Saam Tv
मनोरंजन बातम्या

Soni Razdan News : आलिया भट्टच्या आईसोबत झाला मोठा स्कॅम, पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिला महत्वाचा सल्ला

Alia Bhatt Mom Soni Razdan News : आलिया भट्टची आई सोनी राझदान यांना हॅकरने आपल्या रॅकेटमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्या रॅकेटचा बळी ठरल्या नाही. सोनी राझदान यांनी घडलेला प्रकार इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत सांगितला आहे.

Chetan Bodke

सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने लोकांकडून पैसे उकळण्याचे प्रकार समोर येत असतात. हॅकर्स कोणत्या पद्धतीने आपल्या कडून पैसे उकळतील हे सांगू शकत नाहीत. असाच काहीसा प्रकार अभिनेत्री आलिया भट्ट हिच्या आईसोबत घडला आहे. अभिनेत्रीने घडलेला सर्व प्रकार इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत सांगितलेला आहे.

शेअर केलेल्या पोस्टमध्ये सोनी राजदान म्हणतात, “आपल्या आजूबाजूला खूप मोठे रॅकेट सुरू आहे. कोणीतरी मला फोन केला आणि सांगितले की तो दिल्ली कस्टममधून बोलत आहेत. त्यांनी मला सांगितले की, मी काही बेकायदेशीर ड्रग्सची ऑर्डर दिली आहे. त्यानंतर त्यांनी माझ्याकडे आधार कार्ड क्रमांक मागितला. ज्याप्रमाणे मला कॉल आला, त्याचप्रमाणे इतरही कोणाला तसा फोन आलाय का?, याची मी माझ्या आसपास चौकशी केली.”

“हे लोक आपल्याला फोन करून घाबरवतात, धमकावतात आणि अशाप्रकारे बोलून आपल्याकडून ते बक्कळ पैसा काढतात. मुख्य गोष्ट अशी की, कोणीही त्यांच्या बोलण्यात अडकू नका किंवा त्यांच्या बोलण्याने प्रभावित होऊ नका. माझ्या माहितीत कोणीतरी त्यांच्या बोलण्यात अडकले आहेत आणि त्यांना खूप पैसे ट्रान्सफर केले आहेत. तो व्यक्ती खूप टेंशन मध्ये आहे. अशी गोष्ट केव्हाही कोणासोबत घडू नये. याकरिता मी इन्स्टा पोस्ट शेअर करते. ”

“जेव्हा त्या लोकांनी मला माझा आधार कार्ड क्रमांक विचारला, तर त्यांना मी नंतर देईन असे सांगितलं. तर त्यांनी मला पुन्हा कॉल केला नाही. पण हा अनुभव माझ्यासाठी खूप भीतीदायक होता. जर तुम्हाला अशा कोणत्याही नंबरवरून कॉल आला असेल तर तो त्वरित सेव्ह करा. त्यानंतर त्वरित पोलिसांसोबत संपर्क साधा. मी अशा तीन लोकांना ओळखते. ज्यांना अशाप्रकारचे फोन येऊन गेले आहेत. यामुळेच तुम्ही सावधान राहा आणि सुरक्षित राहा.”

आलिया भट्टची आई सोनी राझदान यांना हॅकरने आपल्या रॅकेटमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्या रॅकेटचा बळी ठरल्या नाही. सोनी राझदान यांनी घडलेला प्रकार इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत सांगितला आहे. सध्या त्यांची इन्स्टा पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budhwar che Upay: बुधवारच्या दिवशी करा फक्त 'ही' 6 कामं; नशीब चमकून घरात होणार पैशांचा पाऊस

Maharashtra Live News Update: खराडी रेव्ह पार्टी प्रकरण, प्रांजल खेवलकर यांच्या जामीनासाठी वकिलांकडून अर्ज

Jio Recharge Offer: जिओ ₹९४९ vs ₹९९९ Plan, जिओचे टॉप प्लॅन फायदे जाणून घ्या

Maharashtra Weather Update : पुढील ५ दिवस पावसाचे, अनेक जिल्ह्यांना अलर्ट, वाचा IMD चा इशारा

FASTag Pass: वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! ३००० रुपयांचा पास अन् वर्षभर मोफत प्रवास, या अ‍ॅपवर करता येणार अर्ज

SCROLL FOR NEXT