Ved Marathi Movie Teaser Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ved Teaser Out: रितेश देशमुखच्या 'वेड'चा टीझर प्रदर्शित, टीझर पाहून प्रेक्षकांना लागले चित्रपटाचे वेध

अभिनयासोबतच रितेश देशमुखने या चित्रपटाचे दिग्दर्शन सुद्धा केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Riteish-Genelia Movie: रितेश आणि जेनेलिया देशमुख ही सर्वांची लाडकी जोडी आहे. हे दोघेही सोशल मीडियावर सक्रिय आहेत. रितेश आणि जेनेलिया नेहमीच एकमेकांसह फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. हे जोडपे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासह प्रोफेशनल गोष्टी सुद्धा चाहत्यांना सांगत असतात. नुकताच रितेशने त्यांच्या 'वेड' चित्रपटाचे टीझर शेअर केले आहे.

रितेशला आपण अनेकदा विनोदी भूमिकेत पाहिले आहे. परंतु 'वेड' चित्रपटामध्ये रितेश एका वेगळ्या भूमिकेत दिसत आहे. चित्रपटाच्या टीझरची सुरुवातच रितेशच्या आवाजाने होत आहे. टीझरवरून असे लक्षात येते की, रितेश एका प्रेमभंग झालेला प्रियकराचे पात्र साकारत आहे. अभिनयासोबतच रितेश देशमुखने या चित्रपटाचे दिग्दर्शन सुद्धा केले आहे. रितेश दिगदर्शित करत असलेला हा पहिला मराठी चित्रपट आहे. (Riteish Deshmukh)

अभिनेत्री आणि रितेश देशमुखची पत्नी जेनेलिया या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत पदापर्ण करत आहे. टीझरमध्ये दाखविण्यात आलेल्या तिच्या भूमिकेवरून अद्याप तिचे पात्र स्पष्ट झालेले नाही. मराठीमध्ये पदार्पण करण्यासोबतच जेनेलियाने या चित्रपटाची निर्मिती देखील केली आहे. जेनेलियाने यापूर्वी हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आहे.

'वेड' चित्रपटाचे टीझर शेअर करत रितेशने त्याला एक सुंदर कॅप्शन देखील दिले आहे. 'एका नव्या प्रवासाची सुरवात करतो आहे. माझं दिग्दर्शनातलं पहिलं पाऊल. मनात थोडी आतुरता ..थोडी भीती …पण प्रचंड वेड. आशा आहे आपल्याला आवडेल. आशिर्वाद आणि प्रेम असू द्या.' असे रितेशने कॅप्शनमध्ये लिहिले आहे. 'वेड' चित्रपट ३० डिसेंबर रोजी आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. महाराष्ट्रातील प्रेक्षकांना दिग्दर्शक रितेश देशमुखची कलाकृती नक्कीच आवडेल अशी अपेक्षा करूया. (Movie)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बारामतीत बड्या उद्योजकावर भीषण हल्ला! शहरात खळबळ

Maharashtra News Live Update: मुंबईत गॅंगवॉर खपवूनन घेतला जाणार नाही- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

त्याने आमचं ऐकलं नाही; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर 'अनिल' नावाची पोस्ट व्हायरल

Tiger Shroff Firing Video: दोन सेकंदात ५ राउंड; अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर

टायगर श्रॉफवर ५ राऊंड फायर, गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; बॉलीवूड हादरलं | VIDEO

SCROLL FOR NEXT