Vicky Kaushal SAAM TV
मनोरंजन बातम्या

Vicky Kaushal : 'छावा' च्या घवघवीत यशानंतर विकी पोहचला बाबुलनाथ मंदिरात, घेतलं महादेवाचे दर्शन

Vicky Kaushal Visit Babulnath Temple : 'छावा' चित्रपटाच्या यशानंतर अभिनेता विकी कौशलने बाबुलनाथ मंदिराला भेट दिली आहे. त्याच्या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Shreya Maskar

बॉलिवूडचा अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal ) सध्या त्याच्या 'छावा' चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. 'छावा' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने तीन दिवसात १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. तर चार दिवसात चित्रपटाचे बजेट वसूल केले आहे. चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर विकी कौशल देवदर्शनाला गेला आहे. 'छावा' चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटाचे शो हाऊसफुल्ल पाहायला मिळत आहेत.

'छावा'च्या यशानंतर विकी कौशल मुंबईतील बाबुलनाथ मंदिरात ( Babulnath Temple) पोहोचला आणि भगवान शंकराचे दर्शन त्याने घेतले आहे. याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये विकी कौशल बाबुलनाथ मंदिराच्या गाभाऱ्यात पाहायला मिळत आहे. तो शंकराची पूजा करत आहे. मंदिरात जाण्यासाठी विकीने पारंपरिक पोशाख केला आहे. गोल्डन कुर्ता-पायजमा त्याने परिधान केला आहे. विकीच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.

'छावा' बॉक्स ऑफिस कलेक्शन

'छावा' चित्रपटाने रिलीजच्या चार दिवसात छप्परफाड कमाई केली आहे. चित्रपटाने आतापर्यंत एकूण 140.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 'छावा' चित्रपट तब्बल 130 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. 'छावा' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंगमध्ये जवळपास 5 कोटींची व्यवसाय केला.'छावा' चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता विकी कौशल (vicky kaushal) आणि महाराणी येसूबाईची भूमिकेत रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) पाहायला मिळत आहेत.

'छावा' ओटीटी अपडेट

मीडिया रिपोर्टनुसार, 'छावा' चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. नेटफ्लिक्सने चित्रपटाचे स्ट्रीमिंग राइट्स खरेदी केले आहेत. 'छावा' तीन ते चार महिन्यांनंतर घरबसल्या ओटीटीवर पाहता येणार आहे. मात्र अद्याप निर्मात्यांनी ओटीटी रिलीजच्या डेटची कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: 'या' राशींसाठी महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील; वाचा राशीभविष्य

Ganpati Visarjan 2025: अनंत चतुर्दशीच्या दिवशी बनतोय दुर्मिळ संयोग; 'या' गोष्टी दान करणं मानलं जातं शुभ

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

SCROLL FOR NEXT