Varun Dhawan Injured Saam tv
मनोरंजन बातम्या

Varun Dhawan Injured: 'वीडी 18'च्या शूटिंगदरम्यान वरुण धवन जखमी, इन्स्टा पोस्ट करत दिली माहिती

VD 19 Movie Shooting: स्वत: वरुण धवनने सोशल मीडिया (Social Media) पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.

Priya More

Varun Dhawan Movie:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) त्याचा आगामी 'व्हीडी 18' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाचे शूटिंग सुरु असतानाच वरुण धवन जखमी (Varun Dhawan Injured) झाल्याची माहिती समोर आली आहे. स्वत: वरुण धवनने सोशल मीडिया (Social Media) पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.

वरुण धवन त्याच्या आगामी 'व्हीडी 18' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जखमी झाला. वरुण धवन सध्या दिग्दर्शक एटली कुमारच्या 'व्हीडी 18' चित्रपटाचे शूटिंग करत होता. त्याचदरम्यान त्याच्या पायाला दुखापत झाली. वरुण धवनने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीजच्या माध्यमातून चाहत्यांना जखमी झाल्याची माहिती दिली. वरुण धवनने त्याच्या जखमी पायाचा एक फोटो शेअर केला. ज्यामध्ये अभिनेता आईस थेरपी घेताना दिसत आहे.

यासोबतच वरुण धवनने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओही पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये वरुण धवन सांगतो की, 'मला वाटतं शूटिंगदरम्यान माझ्या पायाला दुखापत झाली होती आणि माझ्या पायाला कसं लागलं हे मला माहीत नाही. पण सध्या मी हेच करत आहे.' व्हिडिओमध्ये वरुण धवन पायावर आइस थेरपी घेत असल्याचे दिसत आहे. व्हिडीओमध्ये वरुणने त्याचा जखमी पाय बर्फाच्या पाण्याने भरलेल्या बेसिनमध्ये बुडवल्याचे दिसत आहे.

एटली कुमार दिग्दर्शित वरुण धवनसोबत 'व्हिडी 18' या चित्रपटात दक्षिणात्य अभिनेत्री कीर्ती सुरेश मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात वरुण धवन जबरदस्त अॅक्शन करताना दिसणार आहे. या चित्रपटाची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. यापूर्वी देखील कलंक चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान वरुण धवन जखमी झाला होता. त्यावेळी त्याच्या पाठीला जखमा झाल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

Breaking News : ऐन गणेशोत्सवात मोठी दुर्घटना; रोपवे तुटल्याने ६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT