Varun dhawan Instagram
मनोरंजन बातम्या

Varun Dhawan Injured: वरुण धवन VD 18 च्या शूटिंगदरम्यान जखमी, इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत दिली माहिती

Satish Kengar

Varun Dhawan Injured:

बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक असलेल्या वरुण धवनबद्दल एक मोठी माहिती समोर आली आहे. सध्या वरुण त्याच्या 'VD 18' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याच्या सेटवरून रोज नवीन अपडेट्स समोर येत राहतात. अशातच वरुण धवनबद्दल एक वाईट बातमी समोर आली आहे. या अभिनेत्याचा चित्रपटाच्या सेटवर अपघात झाला असून त्यात तो जखमी झाला आहे.

या अपघातामुळे वरून जखमी झाला असून त्याने स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांना याची माहिती दिली. वरुणने आता त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करून त्याच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. अभिनेत्याने इन्स्टा स्टोरीवर स्वतःचा एक फोटो अपलोड केला आहे. या फोटोमध्ये त्याचा फक्त पाय दिसत आहे, ज्यामध्ये पायाला बरीच सूज आल्याचं दिसतंय.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Varun Dhawan

त्याने इन्स्टा स्टोरीवर फोटो शेअर केल्यानंतर अनेक चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. असं असलं तरी घाबरण्याची गरज नाही. वरुणला गंभीर दुखापत झालेली नाही. तो बरा असून त्याला कोणताही मोठा अपघात झाला नाही. (Latest Marathi News)

त्याला किरकोळ दुखापत झाली आहे, त्यामुळे चाहत्यांनी टेन्शन घेण्याची गरज नाही. याआधीही वरुणने या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झालेल्या दुखापतीची माहिती चाहत्यांना दिली होती.

याआधीही त्याला झाली होती दुखापत

दरम्यान, वरुण धवन आपल्या या चित्रपटात खूप मेहनत घेत असल्याचे दिसत आहे. अभिनेता सेटवर वारंवार जखमी होत आहे, तरीही कामाबद्दलचे त्याचे समर्पण कमी होत नाही. या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर वरुणसोबत 'VD 18' मध्ये कीर्ती सुरेश आणि वामिका गब्बी दिसणार आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: 'महाराष्ट्रात काँग्रेसचा मुख्यमंत्री...' बाळासाहेब थोरातांनी सांगितली 'मन की बात'; राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या

BARC Recruitment: भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पात्रता काय? अर्ज कसा कराल?

Soan Papdi Recipe : जिभेवर ठेवताच विरघळेल अशी सोनपापडी; घरच्याघरी कशी बनवायची

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांचा वेगवान आढावा

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT