Tiger Shroff Juhu firing incident video latest update saam tv
मनोरंजन बातम्या

Tiger Shroff Firing Video: दोन सेकंदात ५ राउंड; अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर

Tiger Shroff Firing Video: दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार केल्याचे सांगितले जाते. हल्लेखोरांची ओळख आणि हल्ल्यामागील कारण याबाबत तपास करण्यात येत आहे.

Bharat Jadhav

  • मुंबईतील जुहू परिसरात अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार

  • दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याचा प्राथमिक दावा.

  • मुंबई पोलिसांकडून हल्लेखोरांची ओळख आणि हल्ल्यामागील कारणाचा तपास सुरू

मुंबईतील जुहू येथील परिसरात बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार झालाय. दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञातांनी त्याच्यावर गोळीबार केलाय. या तिघांनी टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार केलाय. हल्लेखोरांनी दोन सेकंदात पाच राऊंड फायर केलेत. टायगर श्रॉफसोबत आणखी दोघेजण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्या या गोळीबाराचा व्हिडिओ समोर आलाय.

जुहूच्या परिसरात गोळीबार झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. पोलीस आता अॅक्शन मोडवर आले असून पोलिसांची बारा पथकं तैनात करण्यात आली आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून ते घटनेचा पंचनामा करत आहेत. पोलिसांनी या भागातील सीसीटीव्ही ताब्यात घेतले असून पोलीस तपास करत आहेत. ते तिघे जण नेमके कोण आहेत? याची माहिती पोलिसांकडून शोधत घेतला जातोय.

अधिक मिळालेल्या माहितीनुसार टायगर श्रॉफ फुटबॉल मॅच खेळून घरी जात होता. याचवेळी दुचाकीवरून आलेल्या 3 अज्ञात व्यक्तींनी टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार केला. यावेळी टायगर श्रॉफ सोबत त्‍याचा कारचा चालकही होता. गोळीबारात चालक जखमी झालाय. या गोळीबाराचा व्हिडिओ समोर आला असून यात आपण पाहून शकतो की, गोळ्या झाडण्याचे आवाज येत आहेत.

अभिनेता टायगर श्रॉफ याची कार जुहू परिसरातून जात असताना दुचाकीवरून आलेल्यांना त्यांच्यावर गोळीबार केला. टायगर श्रॉफ आपल्या कारमधून जात असताना काही चाहते त्याला आवाज देत होते, तर काही जण फोटो घेण्यासाठी आवाज देत होते. त्याचवेळी हल्लेखोरांनी त्यांच्या कारवर गोळीबार केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडमध्ये! टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी पोलिस आयुक्तांना फोन

टायगर श्रॉफवर ५ राऊंड फायर, गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; बॉलीवूड हादरलं | VIDEO

मोठी बातमी! अभिनेता टायगर श्रॉफवर अज्ञातांकडून गोळीबार

औषधाच्या पाकिटावर असलेल्या लाल रंगाच्या पट्टीचा अर्थ माहिती आहे का ? जाणून घ्या त्याचे महत्त्व

मुंबई इंडियन्सच्या संघात होणार मोठा बदल; कोण बनणार MIचा पुढचा कर्णधार? 'या' खेळाडूंच्या नावाची जोरदार चर्चा

SCROLL FOR NEXT