Sushant Singh Rajput Father KK Singh Plea Rejected Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sushant Singh Rajput Father KK Singh Plea Rejected: सुशांत राजपूत यांच्या वडिलांना मोठा धक्का; हायकोर्टाने याचिका फेटाळली

Sushant Singh Rajput Father News: सुशांतच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘न्याय: द जस्टिस’ चित्रपटासंबंधी दाखल याचिकेवर आज, बुधवारी दिल्ली उच्च न्यायलयाने एक महत्वाचा निर्णय दिला आहे.

Chetan Bodke

Court Dismisses Plea By The Actor’s Father And Observes: दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या आयुष्यावर बेतलेल्या न्याय: द जस्टिस या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली हायकोर्टानं फेटाळली.

बॉलिवूड अभिनेता दिवंगत सुशांतसिंह राजपूत याच्या आयुष्यावरील चित्रपट 'न्याय : द जस्टिस'वर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली हायकोर्टानं फेटाळून लावली. सुशांतच्या वडिलांनी ही याचिका दाखल केली होती. सुशांतसिंह राजपूतच्या सोबतच त्याचे सर्व अधिकार संपुष्टात आले आहेत, अशी टिप्पणीही कोर्टाने केली. सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल केली होती.

सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेत सुशांत सिंह राजपूतच्या जीवनावर आधारित चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. याचिकेत सुशांतच्या वडिलांनी आपल्या मुलाचे नाव किंवा त्याच्यासारखी पात्रे चित्रपटात वापरण्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. याचिकेत सुशांत सिंह राजपूतच्या आयुष्यावर येणाऱ्या काही चित्रपटांचा देखील याचिकेत उल्लेख केला आहे, ज्यात 'सुसाइड ऑर मर्डर: ए स्टार वॉज लॉस्ट', 'शशांक' आणि आणखी एका चित्रपटाचा समावेश आहे.

न्यायमूर्ती संजीव नरुला यांच्या खंडपीठाने सुशांतचे वडील केके सिंग यांनी सुशांतच्या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची केलेली मागणी फेटाळली. ‘न्याय: द जस्टिस’ हा चित्रपट अभिनेत्याच्या जीवनावर आधारित नसल्याचे सांगण्यात आले. सुशांतसिंह राजपूत याच्यासोबतच त्याचे सर्व अधिकार संपुष्टात आले, असे कोर्टाने स्पष्ट केले.

लॅपलॉप या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित झाल्याची माहिती मिळत आहे. कोर्टाने सुशांत सिंहच्या वडिलांमार्फत दाखल केलेली ही याचिका फेटाळली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यावर जोरदार पाऊस

Rain Alert : राज्यात मुसळधार पाऊस धुमाकूळ घालणार! ३१ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता; IMD चा मोठा अलर्ट

Building Collapse : भिवंडी हादरली! ४ मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळली; दोघांचा मृत्यू, ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती

PM modi Video : पेपर लीकप्रकरणी पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ मेसेज, घोटाळेबाजांना कडक इशारा

Today's Horoscope : 'या' ६ राशींसाठी शु्क्रवार अत्यंत भाग्यशाली! अचानक होणार धनलाभ? पाहा तुमचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT