Misson Majnu Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sidharth Malhotra: सिद्धार्थचा लूक पाहून नेटकरी संतापले, म्हणाले, बॉलिवूड कधी सुधारणार?

भारतीय 'रॉ एजंट' भूमिकेत असलेल्या सिद्धार्थ मल्होत्राचे भारतात कौतुक होत असताना, पाकिस्तानात मात्र टीकेला सामोरे जावे लागत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sidharth Malhotra Upcoming Movie: बॉलीवूड स्टार्सच आणि बॉलिवूड चित्रपटांचे पाकिस्तानही विशेष नाते आहे. गेल्या 100 वर्षांपासून बॉलिवूड सिनेमा पाकिस्तान आणि तेथील लोकांचे आपापल्या पद्धतीने चित्रण करत आहे. तसेच काहीसे आगामी 'मिशन मजनू' या बॉलिवूड चित्रपटात करण्यात आले आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि रश्मिका मंदान्ना या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि रश्मिका मंदान्ना यांच्या या अॅक्शन थ्रिलर चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला झाला. या चित्रपटाला भारतातील प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. परंतु पाकिस्तानी प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रतिक्रिया पाहता, 'मिशन मजनू'मधला सिद्धार्थचा लूक आणि निर्मात्यांनी पाकिस्तानची स्टाईल दाखवलेली पद्धत त्यांना आवडली नाही. 'मिशन मजनू'च्या ट्रेलरवर पाकिस्तानातील लोकांच्या सोशल मीडियावरील प्रतिक्रियांवरून हे स्पष्ट होत आहे.

भारतीय 'रॉ एजंट' भूमिकेत असलेल्या सिद्धार्थ मल्होत्राचे भारतात कौतुक होत असताना, पाकिस्तानात मात्र त्याला टीकेला सामोरे जावे लागत आहे. चित्रपटात सिद्धार्थला एका मिशनवर पाठवण्यात आले आहे, जो एका पाकिस्तानी मुलीशी लग्न करून पाकिस्तानात जातो. रश्मिका मंदान्ना पाकिस्तानी मुलीच्या भूमिकेत आहे. त्यानंतर सिद्धार्थच्या पोशाखात आणि बोलण्यात बदल करून तो पाकिस्तानात स्थायिक झाल्याचे दाखविण्यात आले आहे. परंतु पाकिस्तानी लोकांना त्याची शैली फारशी आवडलेली नाही.

सोशल मीडियावर 'मिशन मजनू'च्या ट्रेलरमध्ये सिद्धार्थच्या पाकिस्तानी गेटअपला पाकिस्तानी यूजर्स प्रचंड ट्रोल करत आहेत. इतकेच नाही तर सिद्धार्थच्या या गेटअपला नकली म्हणत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ते या लूक विषयीची नाराजी व्यक्त करत आहे. पाकिस्तानी प्रेक्षक म्हणत आहेत की, बॉलीवूड प्रत्येक वेळी कलाकारांना त्याच त्याच लूकमध्ये दाखवतात.

बॉलीवूड सिनेमांमध्ये नेहमीच कलाकार आदर, जनाब, पांढरी टोपी, डोळ्यात सुरमा असे दाखवले जातात. युजर्सनी सिद्धार्थचा लूक शेअर करत असे होत नसल्याचे सांगितले आहे. त्यांचे म्हणणे आहे की जो पाकिस्तानात लोक नेहमी असे नसतात. बॉलिवूड इतका स्टिरिओटाईप का आहे? तसेच काही युजर्स म्हणत आहेत की, बॉलीवूड कधी सुधारेल का?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अशा प्रतिक्रियांवरून स्पष्टपणे दिसून येते की, पाकिस्तानी लोक 'मिशन मजनू'च्या निर्मात्यांवर प्रचंड नाराज आहेत. आता बॉलीवूडमधील कलाकारांच्या लूकमुळे ते संतापले आहेत की पाकिस्तानचे चित्रण इथे चित्रपटांमध्ये केले जात असल्याने ते संतापले आहेत. हे येणारा काळच सांगेल. 'मिशन मजनू' हा चित्रपट 20 जानेवारीला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT