Sidharth Malhotra Net Worth Instagram
मनोरंजन बातम्या

Sidharth Malhotra Net Worth: सिद्धार्थची भारतासह परदेशातही हवा, अभिनेत्याची संपत्ती पाहून उडतील तुमचेही होश

Sidharth Malhotra Birthday News: अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आज आपला 3९ वा वाढदिवस साजरा करतोय. त्याच्या वाढदिवसानिमित्त नेटवर्थबद्दल आणि एकूण संपत्तीबद्दल जाणून घेणार आहोत.

Chetan Bodke

Sidharth Malhotra Net Worth

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आज आपला 3९ वा वाढदिवस साजरा करतोय. आपल्या विशेष मेहनतीने सिद्धार्थने बॉलिवूडमध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्याची गणना बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांमध्ये केली जाते. आज आपण सिद्धार्थच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या नेटवर्थबद्दल आणि त्याच्या एकूण संपत्तीबद्दल जाणून घेणार आहोत.

सिद्धार्थ मल्होत्रा मुळचा दिल्लीचा आहे. त्याचे शालेय शिक्षण झाल्यानंतर त्याने मॉडेलिंग क्षेत्रात आपले करियर करण्याचा निर्णय घेतला. शिक्षण झाल्यानंतर सिद्धार्थने आपल्या वैयक्तिक खर्चासाठी मॉडेलिंग सुरू केली होती. पण नंतर सिद्धार्थने मॉडेलिंग क्षेत्रातच आपले करियर करण्याचा विचार केला. मॉडेलिंगनंतर २००६ मध्ये एका टीव्ही सिरियलमधून सिद्धार्थने अभिनयामध्ये पदार्पण केले.

सिद्धार्थने २००६ मध्ये 'धरती का वीर योद्धा पृथ्वीराज चौहान' या टीव्ही सीरीयलमधून अभिनयाला सुरुवात केली. त्यानंतर करण जोहरसोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केले. सिद्धार्थने २०१२ मध्ये करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर 'मरजावां', 'एक व्हिलन', 'अय्यारी', 'कपूर अँड सन्स', 'बार बार देखो' सारख्या सुपरहिट चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला आला.

एका रिपोर्टनुसार, सिद्धार्थ एका महिन्याला ५० लाखांहून अधिकची कमाई असून ६ कोटी इतकी वार्षिक कमाई आहे. सिद्धार्थ अनेक इंटरनॅशनल ब्रँड्ससाठी काम करतो. यासोबतच सिद्धार्थ न्यूझीलंड टुरिझमचाही ब्रँड ॲम्बेसेडर आहे. सिद्धार्थ एका चित्रपटासाठी ५ ते ७ कोटी रुपये इतके मानधन आकारतो, तर एका जाहिरातीसाठी ते २ ते ३ कोटी रुपये इतके मानधन आकारतो.

सिद्धार्थला बाईक आणि लक्झरी कारची खुपच आवड आहे. सिद्धार्थकडे हार्ले डेव्हिडसन ही स्पोर्टस बाईक सुद्धा आहे, त्याची किंमत १४ लाख रुपये इतकी आहे. सोबतच सिद्धार्थकडे रेंज रोव्हर ही अलिशान कार देखील आहे. सोबतच SUV आणि Mercedes Benz ML 3504 MATIC या अलिशान कार देखील आहेत. सिद्धार्थ मुंबईतील पाली हिल भागात सध्या स्थित आहे. त्याचे घर गौरी खानने डिझाइन केले आहे. सोबतच सिद्धार्थला गॅजेट्सचीही खूप आवड आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT