Kiara Advani and sidharth malhotra image  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Koffee With Karan 7: कियारा-सिद्धार्थ लग्न करणार? रिलेशनशिपच्या प्रश्नावर सिद्धार्थनं दिलेल्या उत्तरानं चर्चा तर होणारच!

बॅालिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी हे दोघे त्यांच्यातील नातेसंबंधांच्या चर्चांमुळं सध्या प्रकाशझोतात आले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: बॅालिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) आणि अभिनेत्री कियारा अडवाणी(Kiara Advani) हे दोघे त्यांच्यातील नातेसंबंधांच्या चर्चांमुळं सध्या प्रकाशझोतात आले आहेत. मागील एका वर्षापासून दोघांच्या डेटिंगच्या आणि ब्रेकअपच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं आहे. मात्र, दोघांनी कधीही त्यांच्या नात्यावर उघडपणे भाष्य केलं नाही. अलीकडेच, करण जोहरच्या लोकप्रिय चॅट शो कॉफी विथ् करणच्या सातव्या पर्वात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेता विकी कौशल सहभागी झाले होते. यावेळी सिद्धार्थने काही रंजक खुलासे केले आहेत. ज्याची जबरदस्त चर्चा सुरू आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरचा कॉफी विथ करण या शोचा सातवा सीझन सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. शोच्या पहिल्या भागापासून हा शो प्रेक्षकांच्या पंसती उतरत आहे. या लोकप्रिय चॅट शोमध्ये अनेक सेलिब्रिटींनी भाग घेतला आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रसारित होणाऱ्या या चॅट शोमध्ये अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक खुलासे केले आहेत.

नुकतेच करण जोहरच्या कॉफी विथ करणच्या आगामी भागात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेता विकी कौशल सहभागी झाले होते. यावेळी शोचे होस्ट करण जोहरने सिद्धार्थला त्याच्या आणि कियाराच्या रिलेशनशिपबाबत प्रश्न विचारला होता. यावर करणने शोमध्ये मी काही सांगत नाही असे सांगितले.

दरम्यान करणने कियाराचा एक व्हिडिओ सिद्धार्थला दाखवला असता, आमचं एकमेकांवर प्रेम असल्याचं सांगितलं. यावर करणने तुमच्यासोबत आमच्या शुभेच्छा आहेत, असे हसत हसत म्हटलं. करणने सिद्धार्थला इशारा करत लग्नाला बोलावले नाही, तर मार खाशील असं म्हणाला. त्यावर असे होणारच नाही, असं सिद्धार्थनं सांगून या रिलेशनशिपच्या चर्चेला पुन्हा फोडणी दिली.

कॅाफी विथ करण या सुप्रसिद्ध चॅट शोमध्ये करणने विचारलेल्या रोखठोक प्रश्नानं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. याचदरम्यान शोचे होस्ट करणने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर ऐकून चाहत्यांनाही आंनद झाला आहे. चाहत्यांनी त्याचे कौतुक केले आहे. सोशल मीडियावर चाहत्यानी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच कमेंटही केल्या आहेत.

सिद्धार्थ आणि कियारा दोघे एकमेकांना २०२१ पासून डेट करत असल्याचं म्हटलं जात होतं. कियाराचा ३० वा वाढदिवस साजरा करण्यासाठी दोघे दुबईला देखील गेले होते. अनेकदा दोघांना एकत्र बघितले सुद्धा होते. अलीकडेच शेरशहा या चित्रपटात दोघे एकत्र दिसले होते. चित्रपटातील दोघांच्या केमिस्ट्रीनं चाहत्यांची मने जिंकली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

Latur News: शिक्षण संस्थाचालकाची आत्महत्या, डोक्यात गोळी झाडून संपवलं; लातूर हादरले

Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, इंजिनिअरचा जागीच मृत्यू

House lizard: घरातील पाल विषारी असते का? ती चावली तर काय होऊ शकतं?

4 Superfoods For Healthy Hair: केस गळती थांबवण्यासाठी आहारात 5 पदार्थांचा करा समावेश

SCROLL FOR NEXT