Siddhant Chaturvedi Instagram @siddhantchaturvedi
मनोरंजन बातम्या

Siddhant Chaturvedi: या' 3 ग्लॅमरस अभिनेत्रींमुळे 'गली बॉय' फेम अभिनेता सोडणार बॉलिवूड?

अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीने केली मोठी घोषणा, म्हणाला मला रिटायर व्हायचे आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत आहे. सिद्धांतने त्याच्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये आपली जागा निर्माण केली आहे. बॉलिवूड 'फोन भूत' (Phone Bhoot) या चित्रपटामध्ये कतरिना कैफ आणि ईशान खट्टरसह दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. 'फोन भूत' चित्रपटाच्या ट्रेलर लाँचमध्ये सिद्धांतने तीन 'ए स्टार' अभिनेत्रींसोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे.

सिद्धांत चतुर्वेदीने त्याच्या 'गली बॉय' (Gully Boy) या पहिल्या चित्रपटात (Movie) आलिया भटसोबत काम केले आहे. ‘गहराइयां’ चित्रपटामध्ये त्याने दीपिका पदुकोणबरोबर काम केला आहे. आगामी चित्रपटामध्ये सिद्धांत कतरिना कैफबरोबर काम करताना दिसणार आहे. ट्रेलर लाँच वेळी सिद्धांतला विचारण्यात आले की त्याचाआलिया, दीपिका आणि कतरिना या अभिनेत्रींसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता. त्यावर सिद्धार्थ म्हणाला, "मला असे वाटते की आलिया, दीपिका आणि कतरिनासह काम केल्यानंतर आता मी रिटायर झाले पाहिजे. मॉडर्न काळातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी त्या ३ आहेत, त्या तिघींबरोबर काम करायला मिळणे माझ्यासाठी सन्मानच आहे."

सिद्धांतकडे सध्या अनेक प्रोजेक्ट आहेत. सिद्धांत लवकरच अनन्या पांडे आणि आदर्श गौरवसोबत 'खो गये हम कहाँ' मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट अर्जुन वरेन सिंग दिग्दर्शित करणार आहेत. ते दिग्दर्शित करत असलेला हा पहिला चित्रपट असणार आहे. मुंबईतील तीन मित्रांच्या डिजिटल युगाची कथा या चित्रपटाच्या माध्यमातून ते मांडणार आहेत. सिद्धांत आणि अनन्या दुसऱ्यांदा एकत्र काम करणार आहेत. शकुन बत्राच्या 'गहराइयां' या चित्रपटात ते दोघे दिसले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पंढरपूरमध्ये राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्याला मारहाण

BPCL Recruitment: भारत पेट्रोलियममध्ये नोकरीची संधी; पगार मिळणार १.४ लाख रुपये; आजच करा अर्ज

Gold Rate Today: गुड न्यूज! सोनं १२००० रुपयांनी झालं स्वस्त, 18K, 22K आणि 24K चे आजचे दर किती?

Bad Skin Habits: रोजच्या 'या' 4 सवयींमुळे त्वचा होतेय खराब, वेळीच द्या लक्ष, नाहीतर दिसाल म्हातारे

High Blood Pressure : मीठ अन्...; 'हे' ५ पदार्थ हाय BP च्या रुग्णांसाठी खूपच घातक

SCROLL FOR NEXT