Shahid Kapoor And Kareena Kapoor Kissing Photos Leaked  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shahid Kapoor Kissing Photos Leaked: शाहिद आणि करीनाचे ५०० रुपयांसाठी ‘नको ते’ फोटो झाले होते लीक; मुलाखतीत केला धक्कादायक खुलासा

Shahid Kapoor And Kareena Kapoor Viral Photos: शाहिद- करीना कपूरचा एक किसींग फोटो सोशल मीडियावर फक्त ५०० रुपयांसाठी लीक झाला होता.

Chetan Bodke

Shahid Kapoor And Kareena Kapoor Kissing Photos Leaked: बॉलिवूडचा हँडसम हंक अभिनेता शाहिद कपूर गेल्या काही दिवसांपूर्वी ‘फर्जी’ वेबसीरिजमुळे आणि ‘ब्लडी डॅडी’ चित्रपटामुळे कमालीच चर्चेत आहे. सध्या शाहिद त्याच्या काही जुन्या किस्स्यांमुळे सोशल मीडियावर तुफान चर्चेत आले आहेत. नुकतंच त्याने इंडस्ट्रीत डेब्यू करताच त्याने इंडस्ट्रीला आपल्या वडिलांची का ओळख सांगितली नाही?, हे सांगितल्यानंतर शाहिदने त्याच्या भुतकाळावर भाष्य केलं आहे.

शाहिद- करीना कपूरचा एक किसींग फोटो सोशल मीडियावर फक्त ५०० रुपयांसाठी लीक झाला होता. २००४ मधील शाहिद कपूरचे आणि त्याची एक्स गर्लफ्रेंड करीना कपूरचे मुंबईतल्या एका नाईट क्लबमधील किस करतानाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. त्यांचे फोटो दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात छापून आल्यानंतर तो तुफान चर्चेचा विषय झाला होता. अनेक वर्षांनी शाहिद कपूरने अखेर त्या प्रकरणावर भाष्य केलेय. या घटनेचा त्याच्यावर आणि त्याच्या फिल्मी लाईफवर किती परिणाम झालाय, याची माहिती दिली.

‘मिड-डे’ या इंग्रजी संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत शाहिद कपुर म्हणाला, “माझा आणि करिना कपूरचा फोटो वृत्तपत्रात छापून आल्यानंतर माझ्या अख्ख्या आयुष्याची बदनामी झाली होती. त्यावेळी मी फक्त २४ वर्षांचाच होतो. त्यावेळी मला वाटलं की, मी माझ्या प्रायव्हेसीसाठी काहीही करू शकत नाही. त्यावेळी मी एकाच विचारत होतो, नेमकं काय झालंय आणि काय होतंय याच विचारात मी होतो. या गोष्टीचा आपल्यावर खूप चुकीचा परिणाम होतो. विशेषत: त्या वयात, जेव्हा एखाद्याला त्यांच्या भावना समजू लागतात आणि डेटिंग सुरू होते, तेव्हा या गोष्टी घडल्या.”

आजच्या सोशल मीडिया आणि पापाराझी संस्कृतीमुळे आता गोष्टी कशा बदलल्या आहेत असे विचारले असता शाहिद म्हणाला, “ज्यावेळी आमचे फोटो लिक झाले होते,त्यावेळी मला माहित होतं, आपल्या सोबत पुढच्या क्षणी काय घडणार आहे, याची कल्पना होती. त्यावेळी आम्ही घाबरलो होतो. याशिवाय माझं लग्न झालंय आणि मला मुलं देखील आहेत.”

सोबतच यावेळी शाहिदने त्यांच्या किसींगचे फोटो सोशल मीडियाावर कसे व्हायरल झाले? याबद्दल सांगितले, “आमच्या स्टुडिओमध्ये दोन मुलं आली आणि त्यांनी सांगितलं, जर तुम्ही ५०० रुपये दिले तर आम्ही तुम्हाला शाहीद आणि करीनाचा क्लबमध्ये किस करतानाचा फोटो देऊ.” शाहिदला त्या दोन्ही मुलांनी ब्लॅकमेल केलं. त्याने पैसे देण्यासाठी नकार दिल्याने थेट त्यांनी ते फोटो लीक केले. आणि त्यानंतर २००७ मध्ये दोघांचंही ब्रेकअप झालं.

शाहिद- मीरा राजपूतसोबत तर करिना- सैफ अलीसोबत आपल्या वैवाहिक जीवनाचा आनंद लुटत आहे.नेहमीच ही जोडी सोशल मीडियावर सक्रिय असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT