Shah Rukh Khan  Saan Tv
मनोरंजन बातम्या

Viral Video: शाहरुख खानने पूर्ण केली फॅन्सची इच्छा, आयकॉनिक पोजने जिंकले साऱ्यांचे मन

शाहरुख खानचा आयकॉनिक पोज करताना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.

Pooja Dange

Shahrukh Khan Viral Video: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान सध्या त्याच्या हमी चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच शाहरुखच्या 'पठान' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 'पठान'चा ट्रेलर प्रेक्षकांना खूप आवडत आहे.

दरम्यान शाहरुख अनेक इव्हेंटमध्ये सहभागी होऊन चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. शाहरुख खानचा एका व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शाहरुख खान त्याची आयकॉनिक पोज करताना दिसत आहे. तसेच त्याने फॅन्ससाठी गाणे देखील गायले आहे.

शाहरुख खान एका इव्हेंटमध्ये सहभागी झाला होता. तिथे त्याचे फॅन्स सुद्धा होतेच. शाहरुखला पाहताच फॅन्सनी त्यांची इच्छा बोलून दाखवली. नेहमीप्रमाणे शाहरुखने त्याच्या फॅन्सची इच्छा पूर्ण देखील केली. शाहरुखच्या फॅन्सनी त्याला त्याच्या सुप्रसिद्ध चित्रपट दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या आयकॉनिक चित्रपटातील एक पोज करण्यास सांगितले होते.

फॅन्सनी सांगताच शाहरुख खानने ती पोज लगेच करून दाखवली आणि आता त्याच्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच शाहरुखने 'तुझे देखा तो ये जाना सनम' हे गाणे गात त्याच्या फॅन्सची आणखी एक इच्छा पूर्ण केली. यामुळे फॅन्स शाहरुखवर खूप खुश झाले.

शाहरुखचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याचे फॅन्स सोशल मीडियावर त्याला रिक्वेस्ट करताना दिसत आहेत. एका यूजरने लिहिले की, "प्लिज शाहरुख सर, तुम्ही कपिल शर्माच्या किंवा बिग बॉस 16 मध्ये प्रमोशनसाठी या." दुसर्‍या यूजरने लिहिलेआहे, "काही उत्कृष्ट चित्रपट आणि सुंदर गाणी करूनही.... DDLJ नेहमी या लिस्टमध्ये टॉपलाचा असणार! वर्षांपूर्वी बनलेल्या चित्रपटाचा दर्जा अजून कायम आहे!!'' तिसऱ्याने लिहिले, ''हँडसम मॅन.'' अशाप्रकारे चाहत्यांनी त्यांचा आनंद आणि उत्साह व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

SCROLL FOR NEXT