Pathaan Movie SRK Look  Saam Tv
मनोरंजन बातम्या

शाहरुखने वाढदिवसाआधीच दिले चाहत्यांना गिफ्ट; 'पठाण' चा टीझर प्रदर्शित, 'या' तिघांच्या लुकने साऱ्यांचेच लक्ष वेधले

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या टीझरनंतर चाहत्यांचा आनंद सोशल मीडियावरुन दिसत आहे. चित्रपट थिएटरमध्ये 25 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होतोय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Pathan Teaser: शाहरुख खानचा अनेक दिवसांनंतर नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याच्या ' पठाण' चित्रपटाची सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे. अनेक वर्षांच्या मोठ्या ब्रेकनंतर शाहरुख खान मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. दिवाळीच्या शूभमुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपटाचा टीझर आला आहे.

चित्रपटाचा टीझर शाहरुख खानच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रदर्शित करण्यात येणार होता. परंतू शाहरुखने आपल्या वाढदिवसाआधीच दिवाळीनिमित्त हे मोठे गिफ्ट चाहत्यांना दिले आहे.

शाहरुख खानच्या आगामी तीनही चित्रपटांबद्दल चाहते खूपच उत्सुक आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या टीझरनंतर चाहत्यांचा आनंद सोशल मीडियावरुन दिसत आहे. चित्रपट थिएटरमध्ये 25 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होतोय. या चित्रपटातून शाहरुख जवळपास ३ वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे. हे पुनरागमन जबरदस्त असणार असल्याचे मानले जात आहे.

यशराज फिल्म्सने हा टीझर ट्विटरवर शेअर करताना लिहिलं, “अखेर प्रतीक्षा संपली… पठाण टीझर प्रदर्शित झाला” शाहरुख खानचा हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त तमिळ आणि तेलुगू या भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे.

शाहरुख आणि दीपिका पुन्हा एकत्र येणार.

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित पठाण चित्रपटामध्ये शाहरुखसोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. याआधी शाहरुख आणि दीपिकाची जोडी 'ओम शांती ओम' आणि 'चेन्नई एक्स्प्रेस' सारख्या चित्रपटात दिसली असून त्यांना चाहत्यांनी खूप पसंती दिली होती. ‘पठाण’ व्यतिरिक्त शाहरुख खान ‘जवान’ आणि ‘डंकी’ या चित्रपटांमध्येही दिसणार आहे.

Edit By: Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राजापूर तालुक्यातील माडबन आणि विजयदुर्ग परिसरात समुद्रात स्फोटा सारखे आवाज

Elvish Yadav-Engaged 2 : महिलेचा टी-शर्ट काढला, आंघोळ घातली अन्...; एल्विश यादवच्या शोमध्ये नेमकं चाललंय तरी काय? VIDEOS पाहून नेटकरी भडकले

Latur Crime : सख्खा भाऊ पक्का वैरी! धाकट्या भावनेचं काढला थोरल्या भावाचा काटा; कारण ऐकून व्हाल थक्क

Accident : भीषण अपघात! ट्रेलरची PCR गाडीला धडक, ५ पोलिसांचा जागीच मृत्यू, ३ जखमी

Viral Video: वधू-वरासह लग्नाचा संपूर्ण स्टेज कोसळला; AI च्या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर खळबळ

SCROLL FOR NEXT