Shahrukh khan and salman khan image Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tiger 3: अखेर ठरलं... शाहरुख आणि सलमान एकत्र येऊन 'टायगर ३'चं खास भागाचं शूटिंग संपवणार

लवकरच एका आगामी चित्रपटातून सलमान खान आणि शाहरुख खान पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Chetan Bodke

Tiger 3 Film Shooting: सलमान खान आणि शाहरुख खान नुकतंच पठान चित्रपटातून एकत्र प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. आता लवकरच एका आगामी चित्रपटातून ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'टायगर ३'मध्ये सलमान आणि शाहरुख एका सीक्वेंससाठी एकत्र दिसणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. येत्या एप्रिल महिन्यात त्यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्सचा हा चित्रपट देखील एक भाग असणार आहे. अशा परिस्थितीत हे दोन्ही कलाकार एकमेकांच्या चित्रपटात सध्या दिसत आहेत. 'पठान'मध्ये सर्वांनीच सलमानचा खास कॅमिओे पाहिला. आता शाहरुखही लवकरच सलमानच्या चित्रपटात दिसणार आहे. गेल्या वर्षीच या चित्रपटाची शूटिंग होणार होती. पण काही कारणास्तव चित्रपटाची शूटिंग होऊ शकली नव्हती.

हे दोघेही एकाच चित्रपटात दिसणे ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वी त्यांनी तब्बल चार चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. या सोबतच मुख्य बाब म्हणजे, शाहरुख आणि सलमानसोबतच 'वॉर चित्रपटात कबीरच्या भूमिकेत हृतिक रोशन या स्पाय ब्रिगेडमध्ये कधी सामील होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

सध्या शाहरुखचा 'पठान' चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करीत आहे. या चित्रपटाने आता पर्यंत भारतात ५११ कोटींचा गल्ला जमावला आहे. या सोबतच शाहरुखने 'पठान' चित्रपटातून तब्बल चार वर्षांनंतर दमदार कमबॅक करीत आहे. या वर्षात त्याचे एकूण तीन चित्रपट येणार आहेत. पठान प्रदर्शित झाला असून येत्या काही महिन्यात जवान आणि डंकी ही प्रदर्शित होणार आहे. 'जवान'च्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल केला आहे. पुर्वी २ जून २०२३ मध्ये चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार होता. पण काही कारणांमुळे तारखेत बदल केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smit Machhar : मुंबईचा कॅप्टन स्मित मच्छार ठरला देवदूत! जीव धोक्यात घालून १७४ प्रवाशांचे प्राण वाचवले; नेमकं काय घडलं?

Rajpal Yadav Viral Video: 'तुम्हाला बाहेर जावं लागेल...'; मुश्ताक खान यांच्या शोकसभेतून राजपाल यादवला खरंच बाहेर काढलं?

Maharashtra News Live Update: प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरण; ठाणे क्राईम ब्राँचकडून ३ महिला ताब्यात

Phone overheating: फोन वारंवार गरम होत असेल तर काय करावं?

Congress: काँग्रेस भवनाबाहेर आढळला महिला नेत्याच्या नवऱ्याचा मृतदेह, डोक्यात गोळी घुसल्याने मृत्यू

SCROLL FOR NEXT