Salman Khan gave special wishes to Riteish Deshmukh on his Birthday Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salman-Riteish: 'भाऊचा बर्थडे आहे, गिफ्ट तो बनता है' सलमान खानने दिल्या रितेश देशमुखला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा

सलमान खानने दिल्या रितेश देशमुखला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा.

Pooja Dange

Riteish Deshmukh Birthday Special: अभिनेता रितेश देशमुख याच आज वाढदिवस आहे. १७ डिसेंबर १९७८ साली रितेशचा लातूर येथे जन्म झाला. रितेशच्या वाढदिवसानिमित्त सलमान खानने एक स्पेशल भेट रितेशच्या चाहत्यांना दिली आहे.

सलमान खानने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओला सलमानने कॅप्शन दिले आहे. त्यात सलमानने म्हटले आहे की, 'भाऊचा बर्थडे आहे - रितेश देशमुख गिफ्ट तो बनता है, एन्जॉय.' (Salman Khan)

सलमानने शेअर केलेला हा व्हिडिओ रितेशचा आगामी चित्रपटातील गाण्याचा आहे. 'वेड लावलय' असं या गाण्याचे नाव आहे. सलमानने 'वेड' चित्रपटातील या गाण्याचा टीझर शेअर केला आहे. या चित्रपटामध्ये सलमान पाहून कलाकार म्हणून हजेरी लावणार आहे. सलमानने रितेशच्या बर्थडे दिवशी हे गाणे शेअर करून रितेशला आणि त्याच्या चाहत्यांना भेट दिली आहे. सलमान याआधी सुद्धा रितेश देशमुखच्या 'लय भारी' या चित्रपटातील एका गाण्यात दिसला होता. (Riteish Deshmukh)

रितेश देशमुखचा 'वेड' चित्रपट ३० डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. रितेशसह जेनेलिया सुद्धा या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून रितेश देशमुख दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहे. तर जेनेलिया या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: १२ वर्षांचा संघर्ष; सतत अपयश; तरी हार नाही मानली; मेहनतीच्या जोरावर झाले SDM; राहुल सिन्हा यांचा प्रवास

Maharashtra News Live Update: राहुरी पोटनिवडणूक सस्पेन्स कायम, प्राजक्त तनपुरे आज घेणार निर्णय

Health Care: रोज सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्यायल्याने शरीराला कोणते फायदे होतात?

इराण- अमेरिका युद्धाच्या 40 दिवसांनंतर उडणार महागाईचा भडका? अन्नधान्य दरानं गाठला 6 महिन्यांचा उच्चांक

Shikanji Recipe : घरीच साखरेशिवाय बनवा गोड शिकंजी, उन्हाळ्यात एक घोट पिताच मन होईल तृप्त

SCROLL FOR NEXT