Salman Khan Image Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salman Khan: बॉलिवूडच्या भाईजानचा दुबईत साखरपुडा?, 'या' फोटोने सोशल मीडियावर चर्चेला उधाण

त्या कार्यक्रमाला सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते सलमानच्या अंगठीने. पापाराझींसह सर्वांनीच या अंगठीवर फोकस केला होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Salman Khan: आगामी इंडियन फिल्म अकादमी पुरस्कार 2023 साठी पत्रकार परिषद 29 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. पुरस्कार सोहळा अबू धाबीच्या यास बेटावर आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाला सलमान खान, करण जोहर, वरुण धवन, फरहान अख्तर, फराह खान आणि बादशाह या कलाकारांनी उपस्थित लावली होती. त्या कार्यक्रमाला सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते सलमानच्या अंगठीने. पापाराझींसह सर्वांनीच या अंगठीवर फोकस केला होता.

सलमान खानच्या मधल्या बोटात नीलम मणीच्या अंगठीने सर्वांचेच लक्ष वेधले होते. त्याने नेहमीप्रमाणे त्याचे ब्रेसलेटही घातले होते, पण अंगठीनेच सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अंगठी पाहून काही चाहत्यांना आश्चर्य वाटले.

सर्वांनाच त्यावेळी वाटले की, कदाचित सलमानचा साखरपुडा झाला असावा. मात्र, ही अंगठी त्याच्या वडिलांनी सलीम खान यांनी भेट दिली होती. सलीम खानने आपल्या सर्व मुलांना हीच अंगठी भेट दिली आहे. अशीच अंगठी अरबाज आणि सोहेलकडेही आहे.

पत्रकार परिषदेदरम्यान सलमान खान म्हणाला, “ मला पुन्हा एकदा आबुधाबीला पुरस्कार सोहळ्यासाठी येताना आनंद होत आहे. गेल्या वर्षी, मी रितेश देशमुख आणि मनीष पॉल यांच्यासोबत पुरस्कार सोहळ्यात सुत्रसंचालन करताना उपस्थित सर्वांना पोट धरुन हसवले.

यावेळी, सलमानने २०२३ च्या आयफा पुरस्कार सोहळ्यासाठी वचन दिले की, या कार्यक्रमात सर्वांसोबत एकत्र डान्स करणार आहे.” आयफा पुरस्कार सोहळा 9 ते 11 फेब्रुवारी 2023 दरम्यान अबुधाबीच्या यास बेटावर पार पडणार आहे. यावेळी देखील सलमान खान या कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs GT IPL 2026 Final: आरसीबीनं जिंकली नाणेफेक, गुजरातला दिलं फलंदाजीचं आमंत्रण

Maharashtra News Live Update: विधानपरिषद निवडणुकीतून अभिमन्यू खोतकर यांची माघार

लाडकी बहीण योजनेच्या अपात्र महिलांना पुन्हा १५०० रुपये मिळणार? सुप्रिया सुळेंची फडणवीस सराकारकडे मोठी मागणी

Fort In Nashik : आकाशाला भिडणाऱ्या पायऱ्यांचा थरार, नाशिकमधील 'या' किल्ल्याची भव्यता पाहून हृदयाचा ठोका चुकेल

Monday Horoscope: कामाच्या ठिकाणी कौतुक होणार, ५ राशींचे बढतीचे योग आहेत; वाचा सोमवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT