Deepika Padukone and Ranveer Singh  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ranveer Singh: 'माझं ना घरी चालतं ना…' रणवीरच्या उत्तराने सर्वांच्याच भुवया उंचावल्या

बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण आणि आपल्या हटके स्टाईलने सर्वत्र चर्चेत असलेला रणवीर सिंह सध्या बराच चर्चेत आहे. यांची ओळख बॉलिवूडमधील पॉवर कपलपैकी एक आहे.

Chetan Bodke

Ranveer Singh: बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण आणि आपल्या हटके स्टाईलने सर्वत्र चर्चेत असलेला रणवीर सिंह सध्या बराच चर्चेत आहे. यांची ओळख बॉलिवूडमधील पॉवर कपलपैकी एक आहे. दीपिका रणवीर हे दोघेही नेहमी आपले प्रेम व्यक्त करत असतात, बऱ्याचदा या दोघांनी भर स्टेजवरही आप-आपले प्रेम व्यक्त केले होते. एकमेकांनी अनेक वर्ष डेट केल्यानंतर आणि काही चित्रपटांमध्ये एकत्र काम केल्यानंतर सात जन्म एकत्र राहण्याचे वचन दिले.

या दोघांचीही जोडी पडद्यावरही बरीच चर्चित होती आणि आता रियल लाईफमध्येही ते चर्चेत आहे. त्या दोघांचीही लव्ह केमिस्ट्री चाहत्यांना तर आवडतेच पण बऱ्याच बॉलिवूड सेलिब्रिटींनाही आवडते. या दोघांनीही आतापर्यंत रामलीला, बाजीराव मस्तानी, पद्मावत आणि 83 या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहेत. सोबतच या दोघांचाही आता लवकरच 'सर्कस' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कालच त्या चित्रपटातील 'करंट लगा रे' हे गाणे प्रदर्शित झाले होते. या गाण्यात रणवीर आणि दीपिका यांनी धमाकेदार डान्स केला आहे.

हा धमाकेदार डान्स सर्वांनाच आवडला आहे. रणवीर नेहमीच आपल्या एनर्जीने सर्वांनाच थिरकायला लावतो. आतापर्यंत त्याने अनेक चित्रपटांत प्रेक्षकांना आपल्या एनर्जीने थिरकायला लावले आहे.

काल झालेल्या म्युझिक लॉंचिंग इव्हेंटला रणवीरसोबत दिपीकानेही हजेरी लावली होती. यावेळी चित्रपटातील कलाकार मंडळीही उपस्थित होते. या दरम्यान प्रत्येकाच लक्ष वेधले ते रणवीर- दिपीका या जोडीने. सोबतच त्यांच्या बॉंडिंगनेही प्रत्येकाचे लक्ष वेधले होते.

या कार्यक्रमात रणवीरने मीडियासोबतही संपर्क साधला होता. यावेळी रणवीरला 'घरात दोघांपैकी कोणाचे सर्वाधिक जास्त चालतं?' असा प्रश्न विचारला. त्या दरम्यान तो बोलतो, " माझं ना घरी चालतं ना ऑफिसमध्ये. तुम्हाला काय वाटलं?" या उत्तराने सर्वाधिक खळबळ उडाली आहे.

दीपिका- रणवीरचा 'सर्कस' हा चित्रपट २३ डिसेंबर २०२३ मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. दीपिकाने बॉलिवूडमध्ये 'ओम शांती ओम' चित्रपटातून पदार्पण केले होते. दीपिका बॉलिवूड सह हॉलिवूमध्ये देखील सक्रिय आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी दीपिकाने अनेक आंतरराष्ट्रीय पातळीवरील ब्रॅंड्सची ब्रॅंड अॅम्बेसिडर म्हणून बरीच चर्चेत होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HBD Ranveer Singh : बॉलिवूडचा बाजीराव किती कोटींचा मालक?

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

SCROLL FOR NEXT