Stree 2 On Amazon Prime Video Saam tv
मनोरंजन बातम्या

Stree 2 Movie On OTT: राजकुमार रावचा 'स्त्री 2' Amazon Prime वर येणार, जाणून घ्या तारीख

Stree 2 Movie on OTT: अष्टपैलू अभिनेता राजकुमार राव हा 2018 च्या कॉमेडी-हॉरर चित्रपटाचा सीक्वल असलेल्या 'स्त्री 2' मधून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

Stree 2 Movie On Amazon Prime:

अष्टपैलू अभिनेता राजकुमार राव हा 2018 च्या कॉमेडी-हॉरर चित्रपटाचा सीक्वल असलेल्या 'स्त्री 2' मधून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तो या चित्रपटातील त्याच 'विकी' हे पात्र घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Amazon Prime व्हिडिओने अलीकडेच जाहीर केले की, हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर आता त्यांच्या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या घोषणेने चाहते आणि समीक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता वाढली आहे. राजकुमार वैयक्तिकरित्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकला नसला तरी त्याचे सह-कलाकार अपारशक्ती खुराना आणि अभिषेक बॅनर्जी यांनीही आशा व्यक्त केलीआहे की, याचा सिक्वेल हा कमालीचा असणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सिक्वेलच्या शूटिंगला गेल्या वर्षी सुरुवात झाली असून "स्त्री " हा राजकुमार रावच्या करिअरची अनोखी व्याख्या करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने केवळ राजकुमार रावची कॉमेडी दाखवली नाही तर, हा अभिनेता बॉक्स ऑफिसवरील सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टर्सपैकी एक आहे.  (Latest Marathi News)

या चित्रपटाने राजकुमार राव, अपारशक्ती खुराना आणि अभिषेक बॅनर्जी यांना मोठ्या प्रमाणावर प्रशंसा मिळवून दिली, ज्यामुळे ते प्रत्येक घराघरात पोहचले.

'स्त्री 2' रिलीज होण्याच्या तयारीत असताना राजकुमार रावची जादू पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहण्याच्या संधीची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'स्त्री 2' व्यतिरिक्त राजकुमार रावचे 'मिस्टर अँड मिसेस माही', 'श्री', 'गन्स अँड गुलाब एस2' आणि 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ' हे प्रोजेक्ट्स देखील पाइपलाइनमध्ये आहे. तो अजूनही 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ'साठी शूटिंग करत असताना, त्याचे 'श्री', 'मिस्टर अँड मिसेस माही' आणि 'गन्स अँड गुलाब्स एस2' हे प्रोजेक्ट यावर्षी येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather : गणेश विसर्जनाच्या दिवशी राज्यात कोसळधार, कोकणाला ऑरेंज अलर्ट; कुठे कसा पाऊस?

Budh-Mangal Yuti: 18 महिन्यांनी होणार बुध-मंगळचा दुर्मिळ संयोग; 'या' राशींचं भाग्य उजळणार

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात डेंगीचे 119 रूग्ण, मलेरियाचे 64 रूग्ण

Maiya Sanman Yojana: या राज्यातील महिलांना दर महिन्याला मिळतात ₹२५००; पैसे आले की नाही; असं करा चेक

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

SCROLL FOR NEXT