Nawazuddin Siddiqui and Aaliya Siddiqui Saam TV
मनोरंजन बातम्या

Nawazuddin Siddiqui: नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीने केला बलात्कारचा आरोप, सोशल मीडियावर शेअर केला व्हिडिओ

आलिया सिद्दीकीने त्याच्यावर बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे.

Saam Tv

Nawazuddin Siddiqui Wife File FIR: बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी गेल्या काही दिवसांपासून त्याच्या कामामुळे कमी आणि घरातील वादांमुळे जास्त चर्चेत आहे. नवाजची पत्नी आलिया सिद्दीकीने त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबावर मारहाण करणे, खोलीत कोंडून ठेवणे असे अनेक गंभीर आरोप केले आहेत. आता यात आणखी एका आरोपाची भर पडली आहे आणि तोही गंभीर.

अभिनेत्याची पत्नी आलिया सिद्दीकीने त्याच्यावर बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. आलियाने आता तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर व्हिडिओ शेअर करत रडत रडत तिच्या वेदना व्यक्त केल्या आहेत.

आलियाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिने दावा केला आहे की, तिने तिच्या बॉलिवूड स्टार पतीविरुद्ध मुंबईतील वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. नवाजच्या पत्नीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे की, नवाजला तिच्याकडून मुले हिसकावून घ्यायची आहेत. आलिया सध्या आर्थिक संकटातून जात आहे. रडत रडत स्वतःची अवस्था सांगणाऱ्या आलियाने सांगितले की, नवाजला त्याच्या मुलांची कस्टडी हवी आहे.

व्हिडिओमध्ये आलिया म्हणते, 'नवाजने काल कोर्टात केस दाखल केली आहे, ज्यामध्ये तो म्हणतो की त्याला मुलाचा ताबा हवा आहे. मला तुमच्याकडून फक्त एवढंच जाणून घ्यायचं आहे की ज्याला मूल कधीच समजलं नाही, ना गर्भात जाणवलं. बाळाच्या डायपरची किंमत किती आहे,डायपर कसे घालायचे हे अद्याप त्याला माहित नाही.

मुलं केव्हा मोठी झाली हे त्याला माहीत नाही, त्याला काहीच माहीत नाही आणि त्याला माझ्याकडून मुलं हिसकावून घ्यायची आहेत. त्याच्या पॉवरचा वापर त्याला तो किती चांगला बाप आहे हे दाखवून द्यायचे आहे. तो त्याच्या पॉवरचा गैरवापर करत आहे. तुम्ही तुमच्या पैशाने कितीही माणसे विकत घेऊ शकता, पण माझी मुले माझ्याकडून हिसकावून घेऊ शकत नाही.

'तुम्ही मला तुमची पत्नी मानत नाही, पण मी तुम्हाला नेहमीच माझा नवरा मानत होतो. पण, ही गोष्ट मी सहन करणार नाही. मला पैशाची अडचण आहे आणि तुम्ही माझी मुले माझ्याकडून हिसकावून घेत आहात. याने मला सर्व बाजूंनी कमकुवत केले आहे आणि आता माझी मुले माझ्यापासून हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत आहे.

नवाज त्याच्या पॉवरमुळे इतका आंधळा झाला आहे की त्याला काहीच समजत नाही. माझ्या एका मुलालाही माहीत नाही की बाप म्हणजे काय, त्याच्यासोबत माझी मुले कशी राहतील. मला न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे की निर्णय माझ्या बाजूने येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhagan Bhujbal : छगन भुजबळांच्या बालेकिल्ल्यात मनोज जरांगेंचा एल्गार; काय आहे येवल्यातील मतांचं गणित? पाहा व्हिडिओ

Priyanka Gandhi : PM मोदींचं चॅलेंज प्रियंका गांधींनी स्वीकारलं; शिर्डीतील सभेत नेमकं काय घडलं? पाहा स्पेशल रिपोर्ट

Milk and Pohe: नाश्त्याला दूध आणि पोह्याचे सेवन करणे ठरते फायदेशीर

Govinda Health Update : प्रचारसभेत असताना गोविंदाची तब्येत बिघडली, अर्धवट सभा सोडून घरी परतला

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या सभेच्या खुर्च्या रिकाम्या, पण निवडणुकीच्या दिवशी...; उद्धव ठाकरेंना नेमकी कसली भीती?

SCROLL FOR NEXT