Nawazuddin Siddiqui Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nawazuddin Siddiqui: नवाजुद्दीन सिद्दीकीने अभिनेत्यांना दिला मोलाचा सल्ला; म्हणाला, 'पैशांसाठी चित्रपट...'

सरफरोश चित्रपटातील एका छोटाश्या भूमिकेने नवाजुद्दीन सिद्दीकी अभिनय क्षेत्रातील प्रवासाला सुरूवात केली होती.

Pooja Dange

Nawazuddin Siddiqui To Bollywood: बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीनेत्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात त्याचे अढळ स्थान निर्माण केले आहे. त्याच्या प्रत्येक कलाकृतीला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. सरफरोश चित्रपटातील एका छोटाश्या भूमिकेने नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाला सुरूवात केली होती. नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या भूमिकांमुळे आणि वक्तव्यांमुळे नेमीचं चर्चेत असतो.

नवाजुद्दीन सिद्दीकीने एका मुलाखतीदरम्यान बॉलिवूड कलाकारांचे मानधन आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन यावर त्यांचे मत व्यक्त केले आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी ने अभिनेते एका वर्षात ४-५ चित्रपट का करतात हे देखील सांगितले आहे. नवाजुद्दीन म्हणाला की, अभिनेते एकाच वेळी ४-५ चित्रपटांमध्ये यासाठी काम करतात जेणेकरून त्यांना जास्त पैसे मिळावेत. जर एका चित्रपटातून पैसे मिळाले नाही तर एका वेळी ४-५ चित्रपटांमध्ये काम करावेच लागेल. अभिनेते अनेक शिफ्टमध्ये काम करतात आणि एका मागून एक चित्रपट करत असतात. मी एका वर्षात एक चित्रपट करायला सुद्धा तयार आहे. पण मला योग्य मानधन मिळायला हवे. (Nawazuddin Siddiqui)

नवाजुद्दीन सिद्दीकीने बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत चिंता करू नये असे सुद्धा सांगितले आहे. नवाजुद्दीनचे म्हणणे आहे की, ज्या अभिनेत्याला बॉक्स ऑफिसची चिंता असते, तो भ्रष्ट असतो. अभिनेता बॉक्स ऑफिसचा विचार का करतो? १०० करोडचे चित्रपट करणाऱ्या अभिनेत्यांनी चित्रपटांचे नुकसान केले आहे. जेव्हा चित्रपटाचे बजेट मर्यादेपेक्षा जास्त असते तेव्हा चित्रपट फ्लॉप होतात. चित्रपट फ्लॉपझाल्यावर अभिनेता, दिगदशक किंवा लेखक फ्लॉप होत नाही. चित्रपटाचे बजेट चित्रपटाला हिट किंवा फ्लॉप ठरवते. (Movie)

आपण चित्रपट हिट होणार किंवा फ्लॉप यावर चिंता व्यक्त करू नये. बजेट आणि बॉक्स ऑफिसचा विचार न करता चित्रपट बनवायला हवा. चित्रपट प्रोग्रेसिव्ह असायला हवा. मी एका छोट्या गावातून आलो आहे आणि 'एक डॉक्टर की मौत' चित्रपट बघून खूप प्रभावित झालो होतो. माझ्यासारखा साधारण माणूस चित्रपट बघून प्रेरित होत असेल, तर चित्रपटात बदल होणे सुद्धा शक्य आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकी 'हड्डी' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. त्याची या चित्रपटातील भूमिका सध्या चर्चेत आहे. 'हड्डी' चित्रपटातील त्याच्या लूकचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बारामतीत बड्या उद्योजकावर भीषण हल्ला! शहरात खळबळ

Maharashtra News Live Update: मुंबईत गॅंगवॉर खपवूनन घेतला जाणार नाही- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

त्याने आमचं ऐकलं नाही; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर 'अनिल' नावाची पोस्ट व्हायरल

Tiger Shroff Firing Video: दोन सेकंदात ५ राउंड; अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर

टायगर श्रॉफवर ५ राऊंड फायर, गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; बॉलीवूड हादरलं | VIDEO

SCROLL FOR NEXT